खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविणार - will teach lesson who dagger in the back, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जुलै 2021

राज्यातील तरुणांचा ओढा भाजपकडे आहे. राज्यातील तिघाडी सरकारमुळे यंत्रणेचा खेळखंडोबा झाला आहे. शिवसेनेने विश्‍वासघात केला, राज्यात युवती व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विश्वासघातकी सरकारला धडा शिकवू, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  म्हणाले. 
 

मालेगाव : राज्यातील तरुणांचा ओढा भाजपकडे आहे. (Youth are attracts towards BJP in the state) राज्यातील तिघाडी सरकारमुळे यंत्रणेचा खेळखंडोबा झाला आहे. (State Government disturb all machinery of state) शिवसेनेने विश्‍वासघात केला, राज्यात युवती व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विश्वासघातकी सरकारला धडा शिकवू, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bavankule) म्हणाले. 

मालेगाव येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, भाजप व युवा मोर्च्याकड़ून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. मतदान अधिकार प्राप्त झालेल्या अराजकीय युवकांना जोडण्याचे काम या दौऱ्याच्या माध्यमातून सुरु आहे. पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, त्यासाठी सज्ज रहावे. 

मालेगाव परिसरातील `कसमादे` दौऱ्यात श्री. बावनकुळे व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. आघार बुद्रुक येथील पदाधिकारी बैठक, सटाणा नाका भागातील शाखा उद्‌घाटन, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील यांच्या बारा बंगला भागातील स्वागत समारोह या ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. युवा वारियर्स मोहिमेच्या माध्यमातुन १८ ते २५ वयोगटातील अराजकीय युवकांना जोडण्यासाठी हा दौरा यशस्वी होत आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

येथील सटाणा नाका भागात भाजप गटनेते सुनील गायकवाड, शहराध्यक्ष मदन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. युवा मोर्चा शहराध्यक्ष युवराज गीते, दीपक गायकवाड यांच्या पुढाकाराने सटाणा नाका व सोयगाव नववसाहत भागातील तीन शाखांचे उद्‌घाटन श्री. बावनकुळे व श्री. पाटील यांच्या हस्ते पार पडले. स्वागत समारंभात जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी पक्ष कुठलाही उमेदवार आयात करणार नाही असे सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्या मनिषा पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. दादा जाधव, लकी गिल, निलेश कचवे, दीपक पवार, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, नंदूतात्या सोयगांवकर, संजय काळे, विजय देवरे, सुधीर जाधव, सुनील शेलार, नितिन पोफळे, राजेन्द्र शेलार, भरत बागुल, विजय भावसार, दिनेश अग्रवाल, किशोर गुप्ता, कुशाभाऊ अहिरे, सर्जेराव पवार, प्रशांत पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
...
हेही वाचा...

आम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख