आम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले! - We deemand water, Ajitdada given us Dam, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

आम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले!

संपत देवगिरे
गुरुवार, 22 जुलै 2021

स्वभावाने अतिशय कडक व स्पष्टवक्ते, पण राजकीय, सामाजिक प्रश्नावर तेवढेच संवेदनशील नेतृत्व म्हणून आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ख्याती आहे. त्यांच्याबरोबर, त्यांचे नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली.  सामान्यांसाठी अहोरात्र झटणारा हा नेता सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत, असे नाशिक बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देविदास पिंगळे यांनी सांगितले.
 

नाशिक : मी खासदार असतानाचा हा प्रसंग आहे. टंचाईमुळे शेतकरी संकटात होते. पाण्याच्या संकटामुळे द्राक्षबागा आणि शेती अडचणीत होती. (Grape Gardens and agreeculture in problem due to scarcity) आम्ही काही शेतकरी घेऊन दादांकडे गेलो. बागा वाचविण्यासाठी एक रोटेशन सोडावे, अशी आम्ही विनंती केली. (We meet Ajitdada pawar with farmers request for water Rotation) दादांनी सर्व माहिती घेतल्यावर म्हणाले, यावर तत्पुरती मलमपट्टी नको. (After listning the issue he said don`t think temporary solution, think about future also) भविष्याचाही विचार करा, असे सांगत त्यांनी थेट किकवी धरणाचा प्रस्ताव मंजूर केला. (He sanction Kikvi dam for Nashik) पाणी मागीतले, तर धरण देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे दादा...

सध्या या किकवी धरणाचे बहुतांशी प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले आहे. जलसंपदा विभागाने त्याची निविदादेखील मंजूर केली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल. गोदावरी खोऱ्यात गंगापूर धरणाच्या वरच्या माथ्याला एक नवे धरण होत असल्याने नाशिक तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल. मुंबईची परसबाग असलेल्या नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला, ऊस, द्राक्ष यांसह विविध नगदी पिके व शेतीतील प्रयोगांना त्याचा हातभार लागणार आहे. नाशिक शेतकरी व बाजार समितीची भरभराट होण्यास भक्कम साथ या धोरणातून लाभते आहे. 

नाशिक कारखाना सुरू होणार
दादांनी काही दिवसांपूर्वी काही धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामुळे सहकारी संस्थांना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल. सहकारी संस्थांना अवसायानातील कारखान्यांच्या निवेदांना देकार देण्याची मंजुरी मिळाली. त्यातून अडचणीत असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्यांची चाके फिरण्याची संधी निर्माण झाली आहे. 

नाशिक कारखान्याचे कार्यक्षेत्र नाशिक, सिन्नर व इगतपुरी या तीन तालुक्यांचे आहे. या तिन्ही तालुक्यांत सध्या दारणा, गोदावरी, वालदेवी यांसह विविध प्रमुख नद्या, धरणे असल्याने सिंचनाची अनुकूलता आहे. येथे उसाचे क्षेत्रदेखील आहे. मात्र नाशिक कारखाना विविध कारणांमुळे स्थापन झाल्यापासून कधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही. जवळपास चाळीस वर्षे तो तोट्यातच होता. 

मी अध्यक्ष असताना दोन वर्षे तो नफ्यात आला होता. मात्र पुढे त्यात सातत्या राहिले नाही. जिल्हा बँकेचे थकीत कर्ज व अन्य देणी आहेत. गेले सात वर्षे तो सुरू व्हावा यासाठी खासगी संस्थांसाठी निविदा काढल्या जात आहेत. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. याबाबत आम्ही शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर दादांनी त्यात लक्ष घातले. त्यांनी सूचना दिल्यावर सहकारमंत्री आता नव्याने निविदा काढणार आहेत. त्यात नाशिक बाजार समिती भाग घेईल. अन्य कोणी कारखाना चालविण्याची तयारी दाखविली नाही, तर शेतकऱ्यांची संस्था असलेली बाजार समिती कारखाना सुरू करील. हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. दादांनी सहकार्य व प्रोत्साहन दिल्याने ते आम्ही यशस्वी करू. नाशिक कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. अजितदादांनी त्याबाबत सहकार्य केल्याने नाशिकचे शेतकरी हे योगदान कधीच विसरू शकणार नाहीत.

स्वभावाने अत्यंत कडक, पण तितकेच संवेदनशील... स्पष्टवक्ते पण तितकेच विनोदीही... काम होणार असेल तर हो म्हणणारे आणि लागलीच ते मार्गीही लावणारे... सलग अठरा ते वीस तास काम करणारे... पवारसाहेबांसारखेच सर्वच विषयांची जाण असणारे... कार्यकर्त्यांना जीव लावणारे... असे अनेक पैलू असणाऱ्या अजितदादांसारखा अत्यंत मेहनती नेता माझ्या ४० वर्षांच्या राजकीय वाटचालीत मी आजवर पाहिला नाही. स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. कार्यकर्ते असो की सर्वसामान्यांचे कोणतेही काम असो ते काम होणारे असेल तरच हो म्हणणारे ते म्हणजे अजितदादा. 'करू.. पाहू.. सांगतो..', हे दादांना कधी जमलंच नाही. काम करताना लागलीच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून तत्काळ काम मार्गी लावणे, ही दादांच्या कामाची खासियत.

दादा स्वभावाने कडक आहेत. परंतु कामांमध्ये त्यांचा हात अवघ्या महाराष्ट्रामध्ये काय तर देशातही कोणी धरु शकत नाही. विधान परिषद वा लोकसभेत काम करत असताना समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न असतील ज्या ज्या वेळेस घेऊन गेलो, त्या त्या वेळेस त्यांनी न्याय दिलेला आहे. नाशिक जिल्हयातील वेगळ्यावेगळ्या मतदारसंघांमध्ये दादांनी तेव्हा विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. जसे पवारसाहेबांचा प्रत्येक विषयामत हातखंडा आहे, अगदी त्याचप्रमाणे अजितदादांचादेखील आहे. मी राजकरणात गेली चाळीस वर्षे कार्यरत आहे. परंतु अजितदादांसारखा प्रचंड मेहनती नेता आजवर मी पाहिला नाही. चोवीस तासांत केवळ चार ते पाच तास झोप घेतात. अनेकदा भल्या सकाळी ६ ची तर कधी कधी रात्री १२ ची 'अपॉइंटमेंट' देऊन ठरलेल्या वेळेत संबंधिताला भेटताना अनेकांनी दादांना पाहिलेलं आहे. रात्री बारा-एकपर्यंत काम करणारा एकमेव नेता होय. राजकरणात अठरा ते वीस तास काम करत असताना भेटणाऱ्याचे काम करणे, संबंधित व्यक्तीस ते कळविणे, त्याचा सतत पाठपुरावा करणे, अशी दादांच्या कामांची वेगळी पद्धत आहे.

मी खासदार असताना राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते मधुकर पिचड यांच्या अकोला मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. पवार कुटुंबीयांनी मंत्रिपद दिले, मानपान, प्रसिद्धी, सत्ता देऊनसुद्धा त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अशा गोष्टी माझ्यासारख्याच्या मनाला वेदना देऊन जातात.  विशेष आठवण सांगत पिंगळे म्हणाले, की ज्यावेळी पवारसाहेबांनी मोठ्या विश्वासाने विधान परिषदेचे तिकीट दिले होते त्यावेळी विजय मिळवून त्यांचा विश्वास संपादन केला. तेव्हा पवार कुटुंबीय परदेशात होते. ते  येणार तेव्हा मुंबई विमानतळावर भेटीसाठी गेलो होतो. त्यावेळी अजितदादांनी आनंद व्यक्त करत कौतुकही केले. कारण, की नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक नगरसेवक असतानादेखील विजय संपादन केला होता. त्यानतंर आजपावेतो त्यांचा खंबीर पाठिंबा व वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. 

'त्या' प्रसंगी दादा पाठीशी उभे राहिले !
मधल्या काळात मी पक्ष सोडावा व भाजपमध्ये यावे, असे बरेच प्रयत्न झाले. वेगवेगळी प्रलोभने देण्यात आली. मात्र पवार कुटुंबीयांवरील प्रेम व श्रद्धेपोटी मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. त्यावेळी मी भाजप प्रवेशाला स्पष्ट नकार दिल्याने माझ्यावर सुडबुध्दीने कारवाईही करण्यात आली होती. तरीही मी डगमगलो नाही. त्यावेळी अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की आपल्या माजी खासदारावर कारवाई झाली. त्यावेळी 'आमचा व आमच्या नेत्याचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, न्यायदेवता योग्य तो निर्णय देईल', अशी भूमिका मांडत अशा प्रसंगातही अजितदादा माझ्या पाठीशी उभे राहिले.

माळरानावर फुलल्या द्राक्षबागा!
नाशिकमध्ये वालदेवी डॅम येथील जवळपास हजारो एकर पडीक जमीन होती. पाणी नसल्याने अगदी वाळवंटाप्रमाणे झालेल्या या जमिनीत पीक घेणे कठीण होऊन बसले होते. त्यावेळी दादांकडे पाठपुरावा केल्याने त्यांनी तत्काळ तब्बल नऊ वसंत बंधारे मंजूर केले. दादांच्या त्या एका निर्णयामुळे ओसाड माळरानावर आज द्राक्षबागा फुलल्या असून, कित्येक शेतकऱ्यांचे भले झाले. यामुळेच तेथील शेतकरी आता सधन झाला आहे. तसेच मी खासदार असताना दिवंगत विलासराव देशमुख व अजितदादा पवारांनी त्यावेळी तत्काळ मंजुरी दिली होती. त्या कामाचे आता टेंडरप्रक्रिया राबविली गेली असेल, त्याचे देखील श्रेय हे दादांना जाते.
...

हेही वाचा...

चंद्रकांत पाटील यांची पाठ फिरताच भाजपमध्ये बंडखोरी!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख