भाजपकडून शहरातील ११ भूखंड हस्तांतरणाचा घाट?

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील ११ मोक्याच्या जागेवरील भूखंड ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव जादा विषयात मंजूर केला.
Satish Kulkarni
Satish Kulkarni

नाशिक :  महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील ११ मोक्याच्या जागेवरील भूखंड ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (BJP is trying to handover 11 prime plots to devolopers on BOT basis) (बीओटी) या तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव जादा विषयात मंजूर केल्यानंतर (They Approve these resolution in Extra business of GB)  निर्माण झालेल्या संशयकल्लोळात आता प्रशासनाची भर पडली असून, प्रस्ताव रद्द (Npw administration is start process to cancel this praposal) करण्याची तयारी सुरू आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्याने उत्पन्नवाढीसाठी शहरातील मोक्याच्या २२ जागांपैकी ११ जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा अशासकीय प्रस्ताव महासभेत सादर केला. ‘बीओटी’तून विकसित होणाऱ्या जागांमधून महापालिकेला सुमारे १०० ते १२५ कोटी रुपये महसूल मिळेल, असा युक्तिवाद महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला. 

‘बीओटी’च्या माध्यमातून जागा विकसित करताना महापालिकेला दोन विभागीय कार्यालये व एक हॉस्पिटल मिळणार आहे. त्यातून वार्षिक शंभर ते सव्वाशे कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होईल. २० ते २२ हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल, असा दावा करण्यात आला होता. आयुक्त कैलास जाधव यांनीही सुरवातीला प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, जादा विषयांमध्ये प्रस्ताव मंजूर केल्याने विविध आरोप- प्रत्यारोप होत आहेत. 

डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या महासभेत भाजपच्या नगरसेविका शाहीन मिर्झा यांनी ‘बीओटी’वर मिळकती विकसित करण्याचे पत्र दिले. त्या पत्राचा आधार घेऊन कमलेश कन्सल्टंट ॲन्ड देवरे- धामणे आर्किटेक्ट या संस्थेला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी काम दिले. 

जानेवारी २०२१ च्या महासभेत मागच्या दाराने तत्कालीन सभागृहनेते सतीश सोनवणे व गटनेते जगदीश पाटील यांच्या पत्रावर मोक्याच्या मिळकती विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महासभेत भाजपचे पूर्ण बहुमत असताना, मागच्या दाराने प्रस्ताव मंजुरीमागे भाजप व प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्ष शिवसेनेने बिल्डरांच्या घशात महापालिकेच्या मिळकती जाऊ न देता राज्य शासनाकडे धाव घेण्याचा इशारा दिला होता. 
प्रस्तावांबाबत संशय  

‘बीओटी’वर महापालिकेच्या मिळकती विकसित करण्यावरून शहरात मोठा वाद निर्माण झाला असून, सत्ताधारी भाजपसह प्रशासनावर संशय व्यक्त होत आहे, तर ‘बीओटी’वर जागा देण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेशी काही बिल्डरांचे हितसंबंध असल्याची चर्चा असल्याने वाद टाळण्यासाठी ‘बीओटी’चे प्रस्तावच रद्द करण्याची तयारी प्रशासनाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com