खबरदार पुन्हा अशी कारवाई कराल तर!

प्लेटिंग उद्योगांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत रविवारी ना. छगन भुजबळ यांच्याकडे बैठक झाली. त्यामध्ये १५ उद्योजकांवर केलेली कारवाई व प्रस्तावित ३४ उद्योगांवरील कारवाई ताबडतोब थांबवावी असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
Industry meeting
Industry meeting

नाशिक : राज्यातील जास्तीत जास्त उद्योग सुरू राहिले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. (Maximum industries should keep start is a government Policy) दुसरीकडे या ना त्या कारणाने बसल्या बसल्या उद्योजकांच्या त्रुटी शोधत नोटिसा पाठवून हकनाक छळ केला जातो. (Otherside administration look faults and issue notices) या शब्दांत अधिकाऱ्यांना धारेवर धरत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नमते घेत प्लेटींग कारखाने बंद करण्याची नोटीस स्थगित केली.  

प्लेटिंग उद्योगांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत रविवारी ना. छगन भुजबळ यांच्याकडे बैठक झाली. त्यामध्ये १५ उद्योजकांवर केलेली कारवाई व प्रस्तावित ३४ उद्योगांवरील कारवाई ताबडतोब थांबवावी असे निर्देश त्यांनी दिले.

गेल्या दीड वर्षां पासून कोरोनाचे संकट सुरु आहे. अनेक उद्योग  बंद आहेत, अशा वेळी पुन्हा उद्योग बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे प्लेटिंग उद्योगांशी चर्चा करून पर्यावरणाची काळजी घेत उद्योग तात्काळ सुरु करण्यात यावे, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

येथील कार्यालयात पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयमा संघटनेच्या पदाधिकारी व प्रदूषण नियत्रण मंडळ अधिकारी, `एमआयडीसी`चे अधिकारी यांच्यासमवेत आज बैठक झाली. 

श्री. भुजबळ यांनी महाराष्ट्र प्रदूषण विभागाचे सचिव अशोक शिनगारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.  प्रदूषण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाशिकचे उद्योग तात्काळ सुरु करण्यात यावे. याबाबत उद्योजक आणि अधिकारी यांनी समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना केल्या. 
राज्यभरात वेगळी नियमावली व नाशिकमध्ये वेगळी नियमावली लावली जाऊ नये महाराष्ट्रभर सर्वांना एकच नियमावली लावण्यात यावी असे आदेश दिले. याबाबत मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे बैठक घेऊन याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.

कोरोना महामारी च्या काळामध्ये उद्योग अत्यंत अडचणीच्या काळातून जात असताना अशा पद्धतीची कारवाई करणे अतिशय चुकीचे असल्याचे सांगून त्यांनी मा. शिनगारे, मुंबई यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. प्रादेशिक अधिकारी यांना स्पष्ट निर्देश देऊन ताबडतोब उद्योग सुरू करावेत व अशी कारवाई पुन्हा करू नये असे या बैठकीमध्ये ठरले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, उद्योजक धनंजय बेळे, निखिल पांचाल, राजेंद्र अहिरे, समीर पटवा, इन्दंरपाल सहानी, सुदर्शन डोंगरे, राधाकृष्ण नाईकवाडे, आशिष कुलकर्णी, `एमआयडीसी`चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी, सह प्रादेशिक अधिकारी दुर्गुळे यांसह उद्योजक उपस्थित होते.
...
ङेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com