नाना पटोलेंचे राज्यात सरकार आहे, या सरकारने काय दिले?

केंद्रातील भाजप सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरीहिताचे आहेत. उलट राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हे सांगावे, असा टीका भाजप नेते आमदार गिरीश यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावर केली.
Girish Mahajan
Girish Mahajan

जळगाव : केंद्रातील भाजप सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरीहिताचे आहेत. (What state government given to Farmers) उलट राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हे सांगावे, असा टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावर केली.

नाना पटोले यांनी फैजपूर येथे केंद्राच्या तीन कृषी कायद्यांची होळी केली, तसेच केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याची टीका केली. यावर आमदार गिरीश महाजन यांनी श्री. पटोले यांच्यावर टीका केली. 

ते म्हणाले, की काँग्रेसचे काय राहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये पार सुपडासफ झाला, तरी यांच्या वल्गना सुरूच असतात. केंद्राला नावे ठेवणाऱ्या श्री. पटोले यांनी राज्यातील त्यांचे सरकार शेतकऱ्यांना काय देते, हे सांगावे. शेतकऱ्यांचे वादळी पावसाने नुकसान झाले. खानदेशतील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना अद्याप एक पैसाही भरपाई दिली नाही. शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा देत नाहीत, त्यांच्या मालाला चांगला हमीभाव देत नाहीत, राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. 

ते पुढे म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेचा भागीदार आहे. मात्र, सरकारमध्ये असूनही काँग्रेस त्यांच्यासाठी काहीही करत नाही. केंद्र सरकारच्या नावाने हे कायम ओरड करीत असतात. केंद्र सरकारने कृषी कायदे करून शेतकरीहित जोपासले आहे. त्यामुळे पटोले यांनी उगाच मोदी सरकारवर टीका न करता राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले
-------
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com