देवयानी फरांदे यांनी `ओबीसी` समाजाला मुर्खात काढू नये!

देशभरातील `ओबीसी` समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थगित झाले आहे. केंद्र सरकारने डेटा दिला नाही आणि राज्यात फडणवीस सरकारने काहीच केले नाही यामुळे हे घडले. मात्र आमदार देवयानी फरांदे या राज्यातील महाविकास आघाडी सराकरला दोष देऊन आंदोलन करीत आहेत.
Bhamre- Pharande
Bhamre- Pharande

नाशिक : देशभरातील `ओबीसी` समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थगित झाले आहे. (SC given adjourn OBC reservation due to non availablity of Centre Government Deta) केंद्र सरकारने डेटा दिला नाही आणि राज्यात फडणवीस सरकारने काहीच केले नाही यामुळे हे घडले. मात्र आमदार देवयानी फरांदे या राज्यातील महाविकास आघाडी सराकरला दोष देऊन आंदोलन करीत आहेत. (BJP doing agitation against State Government) देवयानीताई व त्यांचा पक्ष `ओबीसी` घटकांना मुर्ख समजतात काय? अशी प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष सौ. अनिता महेश भामरे (Anita mahesh Bhmare) यांनी केला आहे. 

यासंदर्भात सौ. भामरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. भारतीय जनात पक्ष ओबीसी आरक्षणाच्या विषयावर उद्या (ता.२६) राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करीत आहे. या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर आणि समता परिषदेचे संस्थापक, मंत्री छगन भुजबळ सदैव जागरूक राहिले आहेत. त्यांच्यामुळेच साडे चारशेहून अधिक जातींना हे आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे भाजप व त्यांचे नेते आंदोलन करून, करून थकतील मात्र जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही, कारण ते खोटे वागत आहेत. 

त्या म्हणाल्या, जर राज्यातील सरकारमुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले असेल, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारला इम्पीरीअल डेटा सादर करावा असे विनंती करणारे पत्र कशासाठी लिहिले होते?, याचा खुलासा आमदार फरांदे यांनी करावा. ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण केंद्रातील भाजप सरकारमुळे स्थगित झाले आहे, आणि भाजप आंदोलन राज्य सरकार विरोधात करतो, हे न उलगडणारे कोडे आहे.     

महाराष्ट्र राज्यात सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आता या विरोधात उद्या ते राज्यभर चक्काजाम आंदोलन करतील देखील. वास्तविक मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण ह्या दोन्ही आरक्षणांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मग आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन का?. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाचा मान राखायचा, दुसऱ्या बाजूला केंद्रात भाजपाचे सरकार असूनही त्यांना क्लीन चीट द्यायची आणि वर आरक्षणाचे सर्व खापर राज्यातील सरकारवर फोडायचे. भाजपचे हे वागणे म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com