ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य शासनच जबाबदार

देशातील इतर राज्यांमध्ये इतर मागासवर्गीयांचे आरक्षण सुरू असताना, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला.
Devyani Pharande
Devyani Pharande

नाशिक : देशातील इतर राज्यांमध्ये इतर मागासवर्गीयांचे आरक्षण सुरू (OBC Reservation is inforce in other states) असताना, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आरक्षण रद्द (State Government responsible for laps of Reservation) झाल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी केला. 

त्या म्हणाल्या, आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ न देण्याचा इशारा त्यांनी दिला. ओबीसी आरक्षण पूर्ववत व्हावे, यासाठी समता परिषदेच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात २६ जूनला मंडल स्तरापर्यंत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात ओबीसी आघाडीतर्फे भूमिका स्पष्ट करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमदार प्रा. फरांदे म्हणाल्या, की ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रातच आरक्षण नसणे हे दुर्दैवी आहे. इतर राज्यात ५० टक्के आरक्षण असताना, महाराष्ट्रातील कायद्यालाच सर्वोच न्यायालय स्थगिती कशी देऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.

सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट २७ टक्के आरक्षण असूच शकत नाही. ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, हा प्रमुख आक्षेप होता. फडणवीस सरकारने आरक्षणासंदर्भातील सर्व कायदेशीर पूर्तता केली होती. तशी अधिसूचनाही काढली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर न करता अध्यादेश रद्द होऊ दिला. सरकार कार्यवाही करीत नसल्याने आरक्षण रद्द करीत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यातून सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसते.

सरकारने आयोग स्थापन करून पिटिशन दाखल केले असते, तर ओबीसी समाजावर अन्याय झाला नसता. आतातरी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी. ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेने सुरू केलेल्या आंदोलनात भाजप सहभागी होणार नसल्याचे स्पष्टीकरण आमदार फरांदे यांनी दिले. आरक्षण मिळावे यासाठी भाजपतर्फे शनिवारी (ता. २६) चक्काजाम आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप ओबीसी आघाडीचे संजय शेवाळे, चंद्रकांत थोरात, मनोज शिरसाठ, प्रशांत जाधव, सुनील केदार आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com