मृत्यूचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांत तफावत का?

ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून कोरोनाची दुसरी लाट येणार, असा कयास होता. मात्र आपण गाफिल राहिलो. अजूनही मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत नाही. प्रत्येकाच्या जवळची, परिचयाची मंडळी कोरोनाने गिळंकृत केली आहे. मृत्यूचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकडे यात मोठी तफावत असल्याचं यामुळेच जाणवतं.
Covid
Covid

नाशिक : ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून कोरोनाची दुसरी लाट (second covid19 wave presict in October) येणार, असा कयास होता. मात्र आपण गाफिल राहिलो. अजूनही मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या (Still covid deaths is ont reducing)  कमी होत नाही. प्रत्येकाच्या जवळची, परिचयाची मंडळी कोरोनाने गिळंकृत केली आहे. मृत्यूचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकडे यात मोठी तफावत (Variation in Death figure and Actuall Figures)असल्याचं यामुळेच जाणवतं.

अमेरिकेने दुसरी लाट थोपविण्यात यश मिळवलं आहे. आपल्याकडे खासगी रुग्णालयांना लसीकरणाची मुभा देणं अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा लसीकरण होऊ शकणार नाही. खासगी रुग्णालयांना मागणी नोंदवता यायला हवी. काळा बाजार रोखण्यासाठी काही नियम घालत खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण वेगाने सुरू व्हायला हवं; अन्यथा आपण शंभर टक्के लसीकरणाचे टार्गेट गाठू शकणार नाही.
लोकसंख्येच्या तुलनेत आपल्या शासकीय यंत्रणांची एवढी क्षमता नाही. सर्व परदेशी लसींना तातडीने परवानगी द्यायला हवी, यात सरकारी अडसर असता कामा नये.

जे लोक लस विकत घेऊ शकतात, त्यांनी ती विकत घेऊन टोचून घ्यायला हरकत असण्याचं काहीही कारण नाही. अनेक संस्था, उद्योगसमूह त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लस विकत घेऊन टोचून घेतील. वैयक्तिकरीत्या लसीकरणाचा डेटा फक्त लोकांनी अपलोड करावा. आधीपासून कागदी घोडे नाचवण्याची ही वेळ नाही. येईल त्याला लस देण्याची तयारी सर्व यंत्रणांनी करायला हवी. राज्य शासनाचे ग्लोबल टेंडर काढण्याचे प्रयत्न त्यामुळेच स्तुत्य ठरतात.

आपण आणि अमेरिका
अमेरिकेत सध्या फायझर आणि मॉर्डनाची १२ ते १५ मुलांवर ट्रायल सुरू आहे. अमेरिकन सरकारने सगळ्या लस आधीच विकत घेऊन ठेवल्या आहेत. अमेरिकेची लोकसंख्या ३२ कोटी आहे. मात्र सध्याच्या घडीला अमेरिकेकडे ४०० कोटी लसींचे डोस आहेत. अमेरिकेत व्हॅक्सीनच्या गाड्यांच्या मागे लाल दिव्याच्या गाड्या असायच्या. मंत्र्यांपेक्षा व्हॅक्सीन घेऊन येणाऱ्या विमानांना प्रथम लॅँडिंग दिलं जात होतं. एक असं उदाहरण ज्यातून आपल्याला काही धडा मिळू शकेल. सीएटलमध्ये एक लस घेऊन जाणारी गाडी स्नो फॉलमध्ये अडकून पडली आणि तिथं मोठी वाहतूक कोंडी झाली. व्हॅक्सीन घेऊन जाणाऱ्या पथकाने तिथेच लसी काढून वाहतुकीत अडकलेल्या सगळ्यांचं लसीकरण करून टाकलं. म्हणजे लस खराब होण्यापासूनही वाचल्या आणि काही शेकड्याने लोकांना लसीकरणही तिथं पार पडलं. आपल्याकडे तर केवळ कवी कल्पना ठरावी. चुकून असं घडलंच तर संपूर्ण घटनेची चौकशी करून पुन्हा कागदी घोडे नाचवले जातील असो...

कोरोनाची अपॉइंटमेंट
गेल्या काही दिवसांत लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करुन मिळालेली अपॉइंटमेंट रद्द होण्याची वेळ अनेकांवर आली, असं होता कामा नये. जर लसींचा पुरेसा साठाच नाही, तर अपॉइंटमेंट देण्याचीही गरजच नाही. अन्यथा लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीत कोरोना अनेकांची अपॉइंटमेंट घेऊ शकतो. यापुढे लसीकरण केंद्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्यास नवल वाटणार नाही, अशी स्थिती आहे. सध्या जर लसींचा पुरवठा कमी आहे, तर अत्यंत गरजूंनाच ती प्रथम द्यायला हवी. आपण सरसकट १८ वर्षांवरील सगळ्यांना लस खुली केल्याने गोंधळात आणखी भर पडली आहे. आता शासकीय यंत्रणांनी लसीकरणाची नेमकी अचूक माहिती वेळोवेळी लोकांपर्यंत पोचवायला हवी. दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी वेगळे केंद्र असावेत, जेणेकरून काही प्रमाणात गोंधळ कमी होऊ शकेल. कारण आता चुकल्यास पुढे माफी नाही, अशी स्थिती नक्कीच आहे.
...
 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com