कोरोना, मराठा आरक्षण चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा

कोरोनाचा राज्यातील फैलाव आणि मराठा आरक्षण या विषयावरील सत्यस्थिती जनतेसमोर यावी. त्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
Pravin Darekar
Pravin Darekar

मुंबई : कोरोनाचा (Corona spreading) राज्यातील फैलाव आणि  मराठा आरक्षण (Maharashtra Reservation) या विषयावरील सत्यस्थिती जनतेसमोर यावी. त्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन (Special Assembly Session) बोलवावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Oppositin leader Pravin Darekar) यांनी केली आहे. 

कोरोना काळात एकीकडे केंद्र सरकार राज्याला मदत करीत नाही, अशा तक्रारी महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. पण केंद्राने महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत केल्याची आकडेवारी आहे. तर दुसरीकडे आपण लसीकरणात विक्रमी कामगिरी केल्याचेही राज्य सरकार सांगत आहे, ही बाब केंद्राच्या मदतीशिवाय शक्यच नाही. फडणवीस सरकारने दिलेले फुलप्रूफ मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले. राज्य सरकारच्या कायदे सल्लागारांचा गोंधळ तसेच सरकारमधील समन्वयाचा अभाव याचमुळे हा प्रसंग आला आहे. या सर्व बाबींचा विधीमंडळ अधिवेशनात सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.  

ते म्हणाले, कोरोनाच्या काळात राजकारण करू नये असे सत्ताधारी सांगत असले तरी राजकारण जोरात सुरु आहे. कोरोनाबाबत राज्य सरकारने विधिमंडळात चर्चा करून राज्यातील जनतेसमोर खरे चित्र आणावे. कोरोनासंदर्भातील उपाययोजना आणि मराठा आरक्षण यावर अधिवेशनात तपशीलवार चर्चा करावी.

कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे डोस मिळण्यात महाराष्ट्र राज्य अव्वल आहेच. पण राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्यातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक लसी पुरवल्यामुळेच जगामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होऊ शकल्याची कबुलीच आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचे दरेकर यांनी दाखवून दिले.
...
https://www.sarkarnama.in/rajya-pune/commissioner-police-said-look-picture-home-eating-popcorn-75591

हेही वाचा...

पोलिस आयुक्त म्हणाले, पाॅपकाॅर्न खात घरी पिक्चर पहा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com