फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादकांचे पैसे मिळवून द्या!

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देऊन त्यांना दिलासा मिळवून द्यावा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
grape growers f
grape growers f

नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. (Take action against fraud grape traders) शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देऊन (Get farmers money from traders and give relief to farmers) त्यांना दिलासा मिळवून द्यावा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

आज जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. परिस्थिती समजून घेऊन ग्रामीण पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले.

यावेळी पालकमंत्री भुजबळ यांना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, २०२०-२१ या हंगामातील दिंडोरी, निफाड, चांदवड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पाडवा ऍग्रो सोल्युशन या एक्सपोर्टर कंपनीकडून अडीच कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे. मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळो  शेतकरी हवालदील झाला आहे. त्यांना दिलासा द्यावा. 

त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो नवीन कायदा करण्यात येत आहे. त्या कायद्यात शेतकऱ्यांची जे फसवणूक करणारे एक्सपोर्टर असतील किंवा स्थानिक व्यापारी यांनी फसवणूक केल्यास त्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी. तसेच व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांचे पैसे लवकर मिळावे यासाठी तरतुद करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी संतोष आहेर, शरद मालसाने, रघुनाथ पाटील, सुनील शिंदे, त्र्यंबक कडलग, मधुकर मालसाने, हिरामण कदम, दौलत मालसाने यांच्यासह दिंडोरी, निफाड,चांदवड व त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com