भुजबळ म्हणाले, `पाणीटंचाई नको, तर भाजपने पाऊस आणावा`

यंदा पावसाची स्थिती चांगली नाही. जेमतेम २७ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे महापालिकेला उपलब्धता पाहून काटकसरीने पाणी वापर करावा लागणार आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : यंदा पावसाची स्थिती चांगली नाही. (Rain situation is not well this sesion) जेमतेम २७ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. (Only 27% sowing in Nashik district) धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे महापालिकेला उपलब्धता पाहून काटकसरीने पाणी वापर करावा (All must avoide wastage of water) लागणार आहे.

आमच्या सत्ताकाळात पाणीकपात नको, अशी भूमिका कुणाला घेता येणार नाही. जर घ्यायची असेल, तर मग पाऊस आणा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला दिला.

शुक्रवारी कोरोना साप्ताहिक आढावा बैठकीनंतर शहरातील पाणीप्रश्नाबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. शहरातील पाणीटंचाईबाबत सत्ताधारी गंभीर नाही. जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र दिल्यानंतरही महापालिकेने शहरात पाणीकपात सुरू केलेली नाही. त्याविषयी श्री. भुजबळ म्हणाले, की सत्तेचा आणि पाणीटंचाईचा काय संबंध. तुमच्या कारकिर्दीत पाणीटंचाई करायची नसेल तर मग पाऊस आणा, असा सल्ला देताना महापालिका आयुक्तांना पाणीस्थिती पाहून कपातीचा निर्णय घ्यावा लागेल अन्यथा टंचाई स्थितीत पाणी उपलब्ध न झाल्यास त्याची जबाबदारी कुणावर द्यायची, असा प्रश्न केला.

आढावा घेऊन निर्णय
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीही, शहरातील पाणीकपातीबाबत पुढील आठवड्यात आढावा घेतला जाणार आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत शहरासाठी पाणी पुरेल, अशी स्थिती आहे. पुढील आठवड्यात पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन कपातीचा निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.
...
होही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com