भाजपच्या नोकरभरतीच्या मनसुब्यांना शासनाचा ‘ब्रेक’ - State Government stayed NMC new appointments, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या नोकरभरतीच्या मनसुब्यांना शासनाचा ‘ब्रेक’

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

शहराचा वाढता विस्तार व कर्मचाऱ्यांवर निर्माण होणारा कामाचा ताण लक्षात घेता महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा रिक्त पदांबरोबरच नवीन पदांचा आकृतिबंध मंजुरीसाठी सुरू असलेल्या खटाटोपाला राज्याच्या नगरविकास विभागाने ब्रेक लावला आहे.

नाशिक : शहराचा वाढता विस्तार व कर्मचाऱ्यांवर निर्माण होणारा कामाचा ताण लक्षात घेता (Due to stress on employee NMC send praposal for recruitment) महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा रिक्त पदांबरोबरच नवीन पदांचा (BJP trying for new posts) आकृतिबंध मंजुरीसाठी सुरू असलेल्या खटाटोपाला राज्याच्या नगरविकास विभागाने ब्रेक (State Government adjourn NMC Recruitment) लावला आहे.

नवीन पदे प्रस्‍तावित करताना ठोस असे समर्थनीय कारण दिले नसल्याने सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे ज्या पदांची आवश्यकता नाही, ती पदे व्यपगत करण्याबरोबरच आउटसोर्सिंग असा पर्यायदेखील सुचविण्यात आल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदांच्या भरतीसाठी आग्रही असलेल्या भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे. 

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टाला १९९५ मध्ये राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्या वेळी महापालिकेचा समावेश क प्रवर्गात करण्यात आला. त्यानुसार सात हजार ९२ विविध संवर्गांतील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर महापालिकेचा समावेश ब वर्गात झाला. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने नवीन सुधारित आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या. रिक्त पदांसह नवीन, अशा एकूण १४ हजार पदांचा समावेश असलेला आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडून आहे. काही महिन्यांपूर्वी शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय व अग्निशमन दलातील ६३५ पदे भरण्यास मंजुरी दिली. मात्र, महापालिकेच्या जुन्या आकृतिबंधातील नव्याने प्रस्तावित केलेल्या सात हजार ४२ जागांच्या निर्मितीबाबत शंका उपस्थित केली. 

नवीन आकृतिबंधाची तयारी 
शासनाच्या नगरविकास विभागाच्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने आकृतिबंधाचा सुधारित प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रशासनाने ४२ विभागांना पत्राद्वारे सूचना देऊन आवश्यक पदांची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. जी कामे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून केली जातील, त्या पदांचादेखील उल्लेख करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून राज्य शासनाने आउटसोर्सिंगवर भर दिल्याचे स्पष्ट होते. 

हे आहेत प्रमुख आक्षेप 
नवीन पदांचा आकृतिबंध सादर करताना महापालिकेने ती पदे का भरली जावीत, याबाबत ठोस समर्थन दिले नाही. प्रशासकीय कामकाजाची व्याप्ती व नवीन विभाग कार्यान्वित होण्यासाठी पदांची आवश्यकता पालिका प्रशासनाने नमूद केली होती. त्यामुळे शासनाने महापालिकेच्या आकृतिबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला स्पष्टपणे पत्र लिहीत प्रस्तावित नवीन पदांसाठी ठोस समर्थनीय कारणे दाखवा, अशा सूचना दिल्या.

महापालिकेतील काही पदांची पदनामे व शासनाकडील समकक्ष पदांच्या परिणामांशी सुसंगत नाही. त्यामुळे शासनाच्या समकक्ष पदनामाप्रमाणे बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या पदांबाबत शासनाकडे निर्णय उपलब्ध नाही अशा पदांसंदर्भात स्पष्टपणे अभिप्राय सादर करावेत. महापालिकेने ७०० सफाई कर्मचारी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरती केले असले, तरी दोन हजार ४२५ सफाई कर्मचाऱ्यांबाबत अभिप्राय न दिल्याने शासनाने या संदर्भात विचारणा केली आहे. 
...
हेही वाचा...

दोन मंत्री, तीन आणदार...तरी शेतकरी समस्यांनी बेजार!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख