दोन मंत्री, तीन आमदार...तरी शेतकरी समस्यांनी बेजार! - Two Ministers, Three MLAs still farmers are worried, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

दोन मंत्री, तीन आमदार...तरी शेतकरी समस्यांनी बेजार!

संपत देवगिरे
मंगळवार, 13 जुलै 2021

केंद्रासह राज्यात मंत्री, एक नव्हे दोन. विधानसभेसह विधान परिषदेतही आमदार एक- दोन नव्हे चक्क तीन आमदार, तरीही कांदा, द्राक्षे, डाळींब उत्पादक शेतकरी समस्यांनी बेजार. असा तालुका म्हणजे येवला....
 

नाशिक : केंद्रासह राज्यात मंत्री, एक नव्हे दोन. (Not just one but two ministers, one in state another in Centre)  विधानसभेसह विधान परिषदेतही आमदार एक- दोन नव्हे चक्क तीन आमदार, (Not one, two but three MLA & MLC`s)  तरीही कांदा, द्राक्षे, डाळींब उत्पादक शेतकरी समस्यांनी बेजार. असा तालुका म्हणजे येवला. कारण या मतदारसंघातील शेतकऱ्यांना केंद्र सरकाकडून धोरणे राबवून सर्वाधिक नाडले जाते. (But still farmers are in Problems)  आता दिल्लीत मंत्री मिळाल्याने नागरिक व कार्यकर्ते पुन्हा हुजरेगिरी करणार की ताठ मानेने प्रश्न सांगून जाब विचारणार यावरच या तालुक्यातील जनतेचे भवितव्य ठरणार आहे. 

येवला तालुक्याला प्रदिर्घ राजकीय वारसा व इतिहास आहे. एकेकाळी ते जिल्ह्याचे केंद्र होते. अनेक शतकांपासून येथे पैठणी विणली जाते. पैठणीचे एक केंद्र पैठण मात्र तीला अटकेपार पोहोचवले ते येवला शहराने. अगदी शंभर वर्षांपूर्वी देखील येवला राजकीयदृष्ट्या जागरूक होते. काँग्रेस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ हे तिन्ही राजकीय विचार येथे सक्रीय होते. तात्या टोपे येवल्याचे तसेच डॅा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली ते येवला शहरच.

डाॅ. भारती पवार यांची नुकतीच केंद्रात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. येवल्याचे आमदार छगन भुजबळ राज्याचे मंत्री आहेत. याशिवाय नरेंद्र दराडे व किशोर दराडे हे दोघे विधान परिषद सदस्य आहेत. त्यामुळे येथे दोन मंत्री व तीन आणदार होतात. येवला-नांदगावचा परिसर राजकीयदृष्ट्या जागरूक राहिलेला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात येवला असताना सातत्याने काँग्रेसला आघाडी देणारा हा भाग होता. मात्र शहर, जनतेचे प्रश्न, शहराचा विकास आणि ज्वलंत राजकीय भूमिका असे. जनसंघाचे नगराध्यक्ष केशवराव पटेल, मदनलाल हेडा, मोतीसिंग परदेशी हे नेते त्यासाठी प्रसिद्ध होते. काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील, निवृत्तीराव बोरकडे, जनार्दन पाटील, मारोतराव पवार, जनता दलाचे यादवराव देशमुख यांसह विविध विचारांची मंडळी जनतेशी जोडलेली होती. ती लोकांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांशी केव्हाही संघर्ष करायला तयार असत. कोणालाही भेटण्यास त्यांना अडचण नसे. हा कणखरपणा नव्या पिढीनेही दाखवला पाहिजे. तरच प्रश्न सुटतील. 

केंद्रीय राज्यमंत्रीपद नाशिकला डॅा सुभाष भामरे यांच्या निमित्ताने यापूर्वीही मिळालेच होते. कारण त्यांचा निम्मा मतदारसंघ नाशिकचा आहेत. त्यांच्यामुळे नाशिकच्या पदरात काय पडले?. हा अनुभव गाठीशी असल्याने त्यापासून बोध घ्यावा. डॅा. भारती पवार राज्यमंत्री झाल्यावर गावोगावी अभिनंदनाचे होर्डींग्ज लागले. ही पोस्टर बॅाय संस्कृती गावोगावी रुजली आहे. त्यातून फार तर एखादे व्यक्तीगत काम होईल. नाशिक जिल्हा, येवला तालुका म्हणून काय?. किमान नाशिक जिल्ह्यात शंभर टक्के लस उपलब्धता तरी होईल का?. कारण दिल्लीत हे खाते याच भागाच्या डॅा भारती पवार यांना मिळाले आहे. याचे चिंतन व्हावे. त्यात पक्षीय विचारसरणी येऊ नये.

एकेकाळी येवलेकरांना साधे जिल्ह्यातील संस्थांवर पदे मिळत नव्हती तेव्हा मुंबई-दिल्ली तर दूरच... पण २००४ पासून येवलेकरांचे नशीब फळफळले आहे. सध्या तालुका खूपच नशीबवान समजला जातोय. कारण केंद्रात, राज्यात मंत्रिपद, मतदारसंघाला तीन आमदार, जिल्हा परिषदेत दोन मानाची सभापतिपदे या महत्त्वाच्या पदांचा लाभ इतिहासात प्रथमच येवल्याच्या पदरात पडला आहे. कधीतरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद येवलेकरांच्या नशिबात गेल्या दोन दशकांपूर्वी पडले होते. मात्र, २००४ मध्ये हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी हा मतदारसंघ निवडला आणि येवलेकरांच्या भाळी तेव्हापासून लाल दिव्याचे नशीब उजळले.

डॅा. भारती पवार काय करणार?
श्री. भुजबळ यांनी फक्त येवला नव्हे तर जिल्ह्यासाठी अनेक मोठी व लक्षात राहतील अशी कामे केली आहेत. कधी काळी पाण्यासाठी तहानलेल्या येवल्यात नार-पारचे पाणी पोहोचले, हे एक दुर्मिळ काम त्यांनी करून दाखवले. आता केंद्रातील राज्यमंत्री असलेल्या डॅा. भारती पवार काय करतात याचीच उत्सुकता आहे.
...

हेही वाचा...

प्रेसच्या सिक्युरिटीला छेदत ५ लाखांच्या नोटांची चोरी 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख