राज्य सरकारने `ओबीसी` आयोग नेमण्यास टाळाटाळ केली 

ज्य मागासवर्गीय आयोगाचे गठण करण्यासह ओबीसी समाजाची माहीती तात्काळ न्यायालयाला सादर करण्याचा आदेश देउनही १५ पंधरा महिने होउनही आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. राज्य शासनाच्या या थंड कारभारामुळे ओबीसी घटकांचे आरक्षण रद्द झाले.
BJP OBC Agitation
BJP OBC Agitation

नाशिक : राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठण करण्यासह ओबीसी समाजाची माहीती तात्काळ न्यायालयाला सादर करण्याचा आदेश (SC Ordered to put up OBC Information in the court) देउनही १५ पंधरा महिने होउनही आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. (State Government done nothing 15 Months) राज्य शासनाच्या या थंड कारभारामुळे ओबीसी घटकांचे आरक्षण रद्द झाले. राज्य शासनाची ही कृती अन्यायकारक आहे. त्याविरोधात आज भाजपतर्फे आक्रोश आंदोलन (BJP OBC Wing Agitaion) करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा, सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर, २०१९ रोजी राज्य शासनाला इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत काही आदेश दिले होते. राज्य शासनाने तातडीने त्याबाबत माहिती द्यावी असे त्यात निर्देशीत केले होते. तसेच लवकरात लवकर मागासवर्ग आयोगाचे गठन करावे. राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाचा डेटा संकलीत करून न्यायालयास सादर करावा. मात्र न्यायालयाच्या या आदेशाबाबात पंधरा महिने होऊनही शासनाने त्याबाबत गांभिर्याने कार्यवाही केली नाही. मागासवर्गआयोगाची निर्मिती करण्यात आली नाही. यासंदर्भात आम्ही राज्य शासनास वेळोवेळी पत्र दिले. काहीही कार्यवाही न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून हे आरक्षण संकटात पडले आहे. याबाबत राज्य शासनाने लवकर योग्य कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 

भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले. राज्यात मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी. राज्यातील ओबीसी समाजाचा डेटा न्यायालयात सादर  करावा. यासंदर्भातील आदेशांची कार्यवाही करून इतर मागासवर्गीय घटकावंरील अन्याय दूर करावा. शासनाने इतर मागासवर्गीयांची माहिती सादर केलेली नाही, ती तातडीने सादर करावी. यापूर्वी एकाही सुनावणीस राज्य शासनाने न्यायालयीन आदेशाची पूर्तता करुन न्यायालयात हजर राहिले नाही. हा ओबीसी समाजावार अन्याय असल्याने ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्यायच नसल्याचे, असे श्री. पालवे यांनी म्हटले आहे.

आंदोलनात शहराध्यक्ष गिरीष पालवे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत थोरात, संजय शेवाळे, शंकरराव वाघ, लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, नगरसेवक कमलेश बोडके, प्रशांत जाधव, सतिष रत्नपारखी यांसह विविध पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com