जिल्हाधिकाऱ्यांनी नियम सांगताच खाजगी खासगी रुग्णालये बॅकफूटवर

खासगी रुग्‍णालयांचा कोविड कक्ष बंद करून रुग्‍णावर उपचार बंद करण्याच्या भूमिकेवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कडक भूमिका घेत रुग्णालयांना अशी असंवैधानिक भूमिका घेता येणार नाही. डॉक्टरांनी अशी भूमिका घेतली, तर प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : खासगी रुग्‍णालयांचा कोविड कक्ष बंद करून रुग्‍णावर उपचार बंद करण्याच्या भूमिकेवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कडक भूमिका घेत रुग्णालयांना अशी असंवैधानिक भूमिका घेता येणार नाही. डॉक्टरांनी अशी भूमिका घेतली, तर प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला.

श्री. मांढरे यांनी बुधवारी हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयांना अशी भूमिका घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. रुग्णालयांच्या काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी व आयुक्त सक्षम आहेत. पण त्यासाठी रुग्णावरील उपचार थांबविता येणार नाहीत. डॉक्‍टरांनी उपचारच न करण्याची असंवैधानिक भूमिका घेऊ नये, असे स्पष्ट केले. दरम्यान, या चर्चेत डॉक्टरांकडून बिल आकारणीच्या अनुषंगाने रुग्णांच्या नातेवाइकांकडून येणारा दबाव हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाबाधितांवरील उपचार बंद करण्याच्या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशन व हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनशी चर्चा झाली. डॉक्‍टर आणि खासगी रुग्णालय कोविड कक्ष सुरू ठेवून उपचार करण्यास तयार असून, हा विषय निकाली निघाला आहे.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com