नांदगाव, मनमाडच्या निवडणुकीसाठी कामाला लागा!

स्थानिक स्वराज्य संस्थांसह नांदगाव अन्‌ मनमाड पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केले.
Pankaj Bhujbal
Pankaj Bhujbal

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांसह (Local municiple & Other Elections) नांदगाव (Nandgaon) अन्‌ मनमाड (Manmad) पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांनी केले. 

मनमाडच्या राष्ट्रवादी भवनात आणि नांदगाव शहरासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार अध्यक्षस्थानी होते. 

श्री. भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. कोकणातील पूरग्रस्तांना शंभर क्विंटल धान्य व जीवनावश्‍यक वस्तूंचे किट नांदगावकरांनी मदत म्हणून पाठविले आहे.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, तालुक्याच्या टंचाई, पाणी प्रश्न तसेच मनमाडच्या अनेक समस्यांवर गेल्या पंचवार्षीकमध्ये अतिशय गंभीर प्रयत्न झाले. त्याचे परिणाम देखील दिसून आले. आगामी काळात येथीस नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेशी नाळ जोडलेला पक्ष असल्याने नागिरकांचा देखील त्यावर विश्वास आहे.  कार्यक्रत्यांनी मनापासून कामाला लागावे आगामी काळातील निवडणुकांत आपल्याला हमखास यश मिळेल. 

या बैठकीस तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विनोद शेलार, योगेश पाटील, रईस फारुखी, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत शिरसाट, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, ओबीसी सेलचे अध्यक्ष समाधान जेजूरकर, ग्रंथालय सेलचे विजय पवार, महिला तालुकाध्यक्ष योगिता पाटील, नांदगाव युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, मालेगाव पूर्व युवक तालुकाध्यक्ष अरुण अहिरे, शहराध्यक्ष सचिन देवकाते, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष अशोक मार्कड, ग्राहक संरक्षण तालुकाध्यक्ष सुशील आंबेकर आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com