किरीट सोमय्या गुपचूप येऊन गेले...अन्यथा प्रसाद खाऊन गेले असते!

मागच्या आठवड्यात किरीट सोमय्या (Kirit somayya) गुपचूप नाशिकला येऊन गेले. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना टार्गेट करून व्यक्तीद्वेषाचे राजकारण करीत आरोप करून गेले. ते गुपचूप येऊन गेले, अन्यथा नाशिककरांचा प्रसाद खाऊन गेले असते.
KIRIT - Kadlag
KIRIT - Kadlag

नाशिक : मागच्या आठवड्यात किरीट सोमय्या (Kirit somayya) गुपचूप नाशिकला येऊन गेले. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना टार्गेट करून व्यक्तीद्वेषाचे राजकारण करीत आरोप करून गेले. ते गुपचूप येऊन गेले, अन्यथा नाशिककरांचा प्रसाद खाऊन गेले असते असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग (Purshottam Kadlag) यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात ते म्हणाले, सोमय्या यांचा केवळ स्वत:चा `टीआरपी` वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या एकमेव उद्देशाने ते गुपचूप नाशिकला येऊन गेले, अन्यथा येथून नाशिकचे फटके खाऊन परतले असते.

मागच्या आठवड्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सी बी आय ने क्लीन चीट दिली. श्री. भुजबळ यांच्यावर आरोप केले गेले. आजपर्यंत एकही आरोप सिध्द झालेला नाही. कोर्टाचे कामकाज सुरू आहे. भुजबळांचा जामीन झाल्यानंतर त्यांनी सर्व आरोप खोडुन काढत जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप वर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या विजयासाठी कंबर कसली. काही जागा अत्यल्प मतांनी गेल्या. सात जागा मिळाल्या, पण भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या गैरकारभाराविषयी तोफ डागण्यास जराही डगमगले नाही.

हल्ली भाजपच्या राजकारणात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्तीस्थळांवर हल्ले करण्याचे धोरण दिसते. असे हल्ले करून मोठे होण्याचा त्यांच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. नेत्यांची बदनामी करून केंद्र शासनाच्या नियंत्रणातील तपास यंत्रणांचा हत्यार वापर करायचा एवढा एकच धंदा किरीट सोमय्या यांच्या सारख्या तोडीबाजांना उरलेला दिसतो. 

भाजपच्या कारकिर्दीत शब्द दिलेल्या विकासाच्या मुद्यांची चर्चा न करता नेत्यांवर बेताल वक्तव्य करत बोंबलत फिरायचे एवढेच काम त्यांच्याकडून सुरु आहे. आता खुप सहन केले. `ईडी`च्या कारवायांना सामोरे जाण्यास महाविकास आघाडीचे सरकार बघण्यास सक्षम आहे. त्या दिवशी आपण उघड दौरा केला असता तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने फटके देऊनच आपले स्वागत केले असते हे मात्र नक्की.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com