`या`मुळे अनिल कदम यांनी जिल्हा बॅंकेत केली आदळ आपट !

जिल्हा बॅंकेत सध्या खरीप हंगामाचे कर्ज वाटप सुरु आहे. यामध्ये बॅंकेने निफाड तालुक्याच्या मंजूरी तक्त्यात सात नव्या संस्थांना कर्ज मंजूर केले. या संस्थांना आमदार दिलीप बनकर यांचे पाठबळ होते. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी बॅंकेत जाऊन आपला संताप व्यक्त केला.
Anil Kadam- Bankar
Anil Kadam- Bankar

नाशिक : जिल्हा बॅंकेत सध्या खरीप हंगामाचे कर्ज वाटप सुरु आहे. यामध्ये बॅंकेने निफाड तालुक्याच्या मंजूरी तक्त्यात सात नव्या संस्थांना कर्ज मंजूर केले. (NDCC Bank aprove Kharip loans to newly registered Co-op societys)  या संस्थांना आमदार दिलीप बनकर (NCP Dilip Bankar) यांचे पाठबळ होते. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam angree on this decision) यांनी बॅंकेत जाऊन आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या  `खास` भाषेचा वापर केल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांत तो चर्चेचा विषय ठरला. 
  
राष्ट्रवादी कॅांग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी शासनदरबारी वजन वापरून निफाड तालुक्यात सात नव्या सहकारी संस्थांना मंजूरी मिळवली. लगोलग जिल्हा बॅंकेकडून त्यांचे कर्ज मंजूरीचे तक्तेही मंजूर झाले. त्यामुळे निफाड तालुक्यातील बनकर विरुद्ध कदम या राजकारणाला फोडणीचे निमित्त मिळाले. विशेषतः बाजार समिती व जिल्हा बॅंकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार बनकर यांनी या संस्थांचा घाट घातला हे ढळडळीत सत्य आहे. मात्र राजकारणच असल्याने त्यांनी यानिमित्ताने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली, हे देखील वास्तव आहे. 

आमदार बनकर आणि माजी आमदार कदम यांच्यातील राजकीय वैमनस्य निफाड तालुक्यातील गावपातळीपासून तर थेट मंत्रालयापर्यंत ख्यात आहे. महाविकास आघाडी आकाराला येऊन शिवसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेस एका छताखाली आले तरीही ही दरी कमी झालेली नाही. या ना त्या कारणावरून दोघांमध्ये राजकीय शह-काटशह सुरू असतो. निफाड तालुक्यात कोरोनामुळे तसे राजकीय पटल शांत होते. आता मात्र हे मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. 

रानवड साखर कारखाना भाडेतत्त्वार घेण्यावरून बनकर-कदम यांच्यात मंत्रालयस्तरावर जोरदार रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे. आमदार बनकर यांनी त्यात बाजी मारली. याचा परिणाम निफाडच्या राजकीय पटलावर होणार हे निश्चि‍त आहे. आमदार बनकर यांनी पुन्हा एक मास्टरस्ट्रोक मारला आहे. पिंपळगाव बसवंत, चांदोरी, तारुखेडले, खानगाव थडी, करंजगाव, पालखेड, नैताळे या गावांमध्ये सात विविध कार्यकारी सोसायट्या शासनस्तरावरून मंजूर करून आणल्या. रासाकानंतर आमदार बनकर यांनी सोसायट्यांचा डाव खेळल्याने कदम यांनी शह देण्यासाठी शस्त्र परजले आहे. नव्या सोसायट्या स्थापन करताना त्यावर समर्थकांची संचालक म्हणून आमदार बनकर यांनी वर्णी लावली. हे संचालक स्वाभाविकच पिंपळगाव बाजार समितीच्या आगामी निवडणुकीचे मतदार असण्याची शक्यता आहे. बनकर-कदम यांच्यातील विधानसभेनंतरच्या लढाईचा दुसरा अंक पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत दिसेल.

कोण वरचढ ठरणार?
पिंपळगावच्या बाजार समितीसाठी सोसायटी गटात सुमारे ८०० मतदार आहेत. त्यात आता नव्याने दोनशे मतदारांची भर पडेल. माजी आमदार कदम यांनी विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीतील आमदार बनकर यांचे राज्य खालसा करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा बहुतांश ठिकाणी भगवा फडकला होता. त्यामुळे आत्मविश्‍वास दुणावलेले कदम यांच्या उत्साहावर बनकर यांच्या चालीने पाणी फेरले आहे. हे प्रकरण आता न्यायालयात जाणार असून, तेथे कोण वरचढ ठरते याकडे लक्ष लागले आहे.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com