राज ठाकरे येताच शिवसेनेकडून संग्रहालयाची साफसफाई 

मनसेच्या सत्ताकाळात उभारण्यात आलेल्या शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र संग्रहालयाच्या परिसरात शिवसेनेकडून गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेने राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे सत्ताधारी भाजपसह मनसेला खिजविण्याचा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.
Ajay Boraste
Ajay Boraste

नाशिक : मनसेच्या सत्ताकाळात उभारण्यात आलेल्या शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र संग्रहालयाच्या परिसरात शिवसेनेकडून गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात (Museum starts in MNS tenure was clean by Shivsena is in disputation) आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (On the eve of MNS leader Raj Thakre) यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेने राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे (This drive is to grab attention of BJP & MNS) सत्ताधारी भाजपसह मनसेला खिजविण्याचा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. 

मनसेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून अनेक महत्त्वाचे प्रकल्प शहरात उभारण्यात आले. त्यात गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशनच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील शस्त्रास्त्रांचे एकत्रित कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्याच्या उद्देशाने कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्त्र संग्रहालय उभारण्यात आले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्याच हस्ते या संग्रहालयाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. इतिहास प्रेमींसाठी संग्रहालय महत्त्वाचे ठरले होते. 

राज्यभर या प्रकल्पाची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अधिकच चर्चा झाली होती. संग्रहालयाचे उद्‌घाटन झाल्यानंतर या प्रकल्पाकडे महापालिकेसह सत्ताधारी भाजप व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचेदेखील दुर्लक्ष झाले. आता महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापत आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुक्रवार (ता.१६) पासून नाशिक दौरा सुरू होत आहे. 

दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेकडून संग्रहालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या भागातील गवत काढण्यात आले. तसेच, औषध फवारणी करण्यात आली. राज ठाकरे या भागाचा दौरा करणार असल्याने शिवसेनेने सफाई केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे व सत्ताधारी भाजपला खिजविण्यासाठी शिवसेनेने सफाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com