अरे, बारामती बारामती काय करता?, बारामतीनेच आरक्षण दिले! - Baramati only gave us reservation, They always with Us; OBC politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अरे, बारामती बारामती काय करता?, बारामतीनेच आरक्षण दिले!

संपत देवगिरे
गुरुवार, 15 जुलै 2021

प्रत्येक वेळेला बारामती, बारामती काय करता?. बारामती तर सदैव तुमच्या सोबत राहिली आहे. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यावर पवार साहेब मुख्यमंत्री होते. मी देखील मंत्री होतो. त्यांनीच तर देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात हे आरक्षण लागू केले.
 

नाशिक : प्रत्येक वेळेला बारामती, बारामती काय करता?. (What repeating Baramati, Baramati. Baramati always with us) बारामती तर सदैव तुमच्या सोबत राहिली आहे. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यावर पवार साहेब मुख्यमंत्री होते. (Sharad pawar was CM, he implement Reservation in the state) मी देखील मंत्री होतो. त्यांनीच तर देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात हे आरक्षण लागू केले, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.       

श्री. भुजबळ यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यासंदर्भात ते म्हणाले, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. अॅड कपील सिब्बल ती दाखल करतील. दोन-चार दिवसांत याचिका दाखल होईल. 

श्री. भुजबळ म्हणाले, आमचा संपूर्ण उद्देश असा आहे, की इतर मागासवर्गीयांचे आरक्षण टिकले पाहिजे. शरद पवार मुख्यमंत्री असताना जे आरक्षण मिळाले, त्याबाबत त्यांचे आर्शिवाद तर आहेतच. वडेट्टीवार ओबीसी खात्याचे मंत्री आहेत. नाना पटोले देखील ओबीसी बाबत बोलतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आरक्षणाच्या बाजुने मजबुतीने उभे आहेत. त्यांनी सांगितले आहे की, कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण टिकवायचे आहे. 

ते पुढे म्हणाले, आता प्रश्न असा आहे की , भाजप किंवा फडणवीस यासंदर्भात त्यांचे आणि आमचे जे सुरु आहे, एक प्रकारे तो कलगीतुरा आहे. मी त्यांना सांगितले, की मला नेतृत्वात रस नाही. हवे तर तुम्ही नेतृत्व करावे, मात्र आरक्षण टिकले पाहिजे. ते कसे टिकवणार ते सांगा. खरे तर आम्ही दिलीप वळसे पाटील यांना भेटायला गेलो होतो. समोरच फडणवीसांचे निवासस्थान आहे. त्यामुळे त्यांनाही भेटलो. चहा घेतला. 

ते म्हणाले, आरक्षणाच्या खटल्याबाबत, रॅंडम सॅम्पल घ्यावेत की, डिटेल माहिती घ्यावी याबाबत त्यांची काही मतं आहेत. आमचे वेगळे मत आहे. मात्र आम्ही सांगितले की, ठिक आहे, हे जे मत आहे, तस आमच्या वकिलांचे मत नाही. कारण मराठा आरक्षणाचे तसे केले होते. मराठा आरक्षण रॅंडम सॅम्पलमुळे फेटाळले गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला काही विरोध केलेला नाही.  निष्कर्षाला विरोध केलेला आहे. त्यामुळे आपण मीडियात वेगवेगळे बोलण्यापेक्षा, तुम्ही देखील ओबीसी आरक्षणाला पाठींबा देता, आम्ही पण देतो. आमची तर ओबीसींसाठी जीथे जायचे तीथे जाण्याची तयारी आहे. कोणाशीही बोलण्याची तयारी आहे. कुठेही जाण्यास तयार आहोत. 

श्री. फडणवीस यांनी सांगितले की, ठिक आहे, आपण तुमच्या वकिलांशी, मागासवर्ग आयोगाशी बोलू. त्यानंतर काय करता येईल हे सांगतो. त्यांनी कबुल केले की, आपण एकत्र बसून यावर तोडगा काढू. सगळे एकत्र आले तरच हा प्रश्न सुटेल. बाकी राजकारणात मला त्यांच्या विषयी काय बोलायचे, ते मी बोलत राहीन. त्यांना माझ्याबद्दल काय बोलायचे, ते त्यांनी बोलत रहावे. मात्र सगळ्यांनी एकत्र येण्याची जी भूमिका आहे, या भूमिकेला शरद पवारांसह बहुतांशी नेत्यांचा पाठींबा आहे. त्यामुळे कोणाला बाजुला सारायचे काही काम नाही, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. 

...

हेही वाचा...

`निवडणूक ही संधी, तीचे सोने करा`
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख