‘निवडणूक ही संधी, तीचे सोने करा’ - Election is a Good chance, take benefit of it, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

‘निवडणूक ही संधी, तीचे सोने करा’

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळाली असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोने करण्याची संधी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले.

पाचोरा : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळाली आहे. (NCP had Positive situation in jalgaon after Eknath Khadse join NCP)  येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोने करण्याची संधी आहे, (All shall take benefits in upcoming local body election) असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक (Avinash Adik) यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्री. आदिक यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विविध सूचना केल्या, सध्या पक्षाला अत्यंत अनुकूल स्थिती आहे. लोक महागाई, केंद्र शासनाचा कोरोनाच्या उपाययोजनेतील ढिसाळपणा, नागरिकांना झालेला त्रास, शेतकरी प्रश्नांवर केंद्र सरकारची उदासीनता व विशेषतः रोज वाढणारे पेट्रोल, डिझेलचे भाव यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यांना एक उत्तम पर्याय देऊन दिलासा देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात केलेली कामे व निर्माण केलेली सकारात्मक प्रतिमा निश्चितच कामाला येईल. त्याचा प्रचारात उपयोग करून या संधीचे सोने करावे.

माजी आमदार दिलीप वाघ यांनी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण झाले असून, तरुणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्याची भावना आहे. यामुळे मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी द्यावा, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा विजय मिळवून देण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन केले.

यावेळी मनीष जैन, पालिका गटनेते संजय वाघ, उमेश नेमाडे, योगेश देसले, नामदेव चौधरी, संजय पवार, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील जिल्हा प्रवक्ता खलिल देशमुख, नितीन तावडे, विकास पाटील, संतोष जाधव, अजहर खान, श्याम भोसले, हर्षल पाटील, विजय पाटील, सुदर्शन सोनवणे, शालिग्राम मालकर, सतीश चौधरी, अविनाश सुतार, बशीर बागवान, सीताराम पाटील, प्रा. भागवत महालपुरे, रणजित पाटील, प्रकाश पाटील आदी आदी उपस्थित होते.

...

हेही वाचा...

गुड न्यूज....`कृषी`च्या ४५ हजार विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख