शिवसेनेच्या बडगुजरांच्या प्रयत्नाने मजूराच्या कुटुंबाला मिळाले ३ लाख - Shivsena leader Badgujar intervein fot labour family help, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेच्या बडगुजरांच्या प्रयत्नाने मजूराच्या कुटुंबाला मिळाले ३ लाख

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

'सुधाकरभाऊ तुमच्यामुळेच मला तीन लाखांची भरपाई मिळाली. माझ्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने देवासारखे मदतीला धाऊन आलात. तुमचे आभार कोणत्या शब्दांत मानू' असे उद्गार अश्विनी विष्णू मोरे या मजुरी करणाऱ्या महिलेने काढले तेव्हा उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.

नाशिक : 'सुधाकरभाऊ तुमच्यामुळेच मला तीन लाखांची भरपाई मिळाली. (Shivsena leader Badgujar helps labour family to get 3 lacs) माझ्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने देवासारखे मदतीला धाऊन आलात. (Family pay regards for help) तुमचे आभार कोणत्या शब्दांत मानू' असे उद्गार अश्विनी विष्णू मोरे (Ashweeni More)या मजुरी करणाऱ्या महिलेने काढले तेव्हा उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.

त्याचे असे झाले की, सिडको येथील विष्णू भगवान मोरे हा मजूर एका ठेकेदाराकडे कामाला होता. ३० जून २०२० ला कामावर असतानाच त्याचा अकस्मात मृत्यू झाला. त्यामुळे त्याची पत्नी व दोन  मुले निराधार झाले होते. विष्णुच्या मृत्यूनंतर ठेकेदाराने त्याच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून काही रक्कम देण्याचे कबूल केले होते. मात्र एक वर्ष उलटूनही ठेकेदाराने आपला शब्द पाळला नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने अखेर त्या मजुराची पत्नी अश्विनी मोरे हीने शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे आपली कैफियत मांडली. 

नगरसेवक बडगुजर यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी त्या महिलेस मदत करण्यासाठी विविध प्रयत्न केले. संबंधीत ठेकेदारास बोलावून घेऊन त्याच्याशी चर्चा केली. सदर महिलेस आश्वासन दिल्याप्रमाणे भरपाई द्यावी, अशी विनंती केल्यानंतर  ठेकेदाराने अश्विनी मोरे यांना तीन लाखांची मदत देण्याचे जाहीर केले. अश्विनी तसेच तिच्या दोन मुलांच्या नावे प्रत्येकी एक लाखाचा धनादेश सादर केला. हे धनादेश श्री. बडगुजर यांच्या हस्ते एका कार्यक्रमात अश्विनी मोरे यांना प्रदान करण्यात आले. 

अश्विनी मोरे यांनी यावेळी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत बडगुजर यांचे आभार मानले. एका निराधार महिलेस न्याय मिळवून दिल्याबद्दल बडगुजर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी प्रकाश मंडलिक, रवी शेट्टी अतुल लांडगे हे उपस्थित होते.
...
हेही वाचा...

नदीजोड प्रकल्पाची कामे तातडीने सुरु करा!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख