नदीजोड योजनेची कामे तातडीने सुरू करा - River link schemes works start immediately, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

नदीजोड योजनेची कामे तातडीने सुरू करा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड योजनेची कामे लवकरात लवकर सुरू करावीत, असे निर्देश विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दमणगंगा-एकदरे-गोदावरी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

नाशिक : दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड योजनेची कामे लवकरात लवकर सुरू करावीत, (River link water schemes should start immediately) असे निर्देश विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Irrigation minster Jayant patil was present in the meeting) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दमणगंगा-एकदरे-गोदावरी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

झिरवाळ यांनी योजनेसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक बाबींबद्दल काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या. ज्यामुळे या प्रकल्पाची किंमत कमी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात विभागाने प्रशासकीय मान्यता व इतर बाबींकरिता प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना जलसपंदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाणीप्रश्‍न काही प्रमाणात सुटून सिंचनात‍ वाढ होईल, असेही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटले. 

याबाबत सविस्तर अहवाल (डीपीआर) राष्ट्रीय जलविकास अभिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून, हे काम प्रगतिपथावर आहे. सप्टेंबरअखेर जलसंपदा विभागास अहवाल सादर होऊ शकेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता अ. रा. नाईक यांनी दिली. 

जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) ए. एन. मुंडे, नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील व अधिकारी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

कृषी मंत्री म्हणाले, `मी अनुभवल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, कथा`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख