संजय राऊत म्हणतात, भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे छळ !

देशातील सध्याच्या नेतृत्वाला पर्याय देण्यासांठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस कमजोर असला, तरी तिसरी आघाडी काँग्रेसशिवाय अशक्य आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
Sanjay Raut
Sanjay Raut

जळगाव : देशातील सध्याच्या नेतृत्वाला पर्याय देण्यासांठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे (All parties should come togather to give option present leadership of country) गरजेचे आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस कमजोर असला, (Congress weak but Third front is not possible without them) तरी तिसरी आघाडी काँग्रेसशिवाय अशक्य आहे, असे मत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

उत्तम महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या खासदार राऊत यांनी शनिवारी पत्रकार संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. पाच आमदार या जिल्ह्यात आहेत. या पाच जणांमुळेच विधानसभेत शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. आता पुढच्या काळात ५५ चे ११० करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ११० आमदार झाले, की पुढचे ५० वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेतृत्व करेल.

भाजपकडून पाच वर्षे छळ
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी मी फक्त निमित्त होतो. भाजपने पाच वर्षे आमचा निव्वळ छळ केला. आमच्या पक्षप्रमुखांविषयी बोलले जात होते. पण राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, हे महाराष्ट्राने दाखवून दिले. महाराष्ट्र हा शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर चालत आला आहे. गुलाबराव पाटील मंत्री आहे म्हणून ताकद नाही, तर ते शिवसैनिक आहेत म्हणून ताकद आहे. सत्ता, राजकारण या स्वतंत्र बाबी असून, संघटना महत्त्वाची आहे.

जळगाव शिवसेनेचा बालेकिल्ला
मुंबई आणि कोकणानंतर राज्याच्या राजकारणात जळगाव जिल्ह्याने मोठा आधार दिला आहे. (स्व.) बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आलो, की आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटते.

प्रशांत किशोर राजकीय नेते नाहीत
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांना भेटले, त्यात वावगे काही नाही. प्रशांत किशोर एका एजन्सीचे काम बघतात. त्यांच्याकडून शिवसेनेनेही काम करून घेतले आहे. ते काही राजकीय नेते नाहीत, की त्यांच्या भेटीने मोठी राजकीय उलथापालथ होईल.

मराठा समाजाचे प्रश्न सुटावे, ही प्रामाणिक इच्छा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, की मराठा समाजाच्या आंदोलनाला एक दिशा मिळावी, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे साकडे घातले. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आवश्यक असलेली घटनादुरुस्ती करायची आहे. त्याला शिवसेना पाठिंबा देईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत.

आगामी निवडणुका स्वबळावरच!

विविध राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकांसंदर्भात घोषणा केल्या जात आहेत. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा झाला. त्यात खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित निवडणुका लढतील, असे संकेत दिले. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, की या संदर्भात अद्याप कुणीही भूमिका जाहीर केलेली नाही. स्वबळ काय असतं, हे आपल्याला माहिती नाही. पण आगामी निवडणुका शिवसेनेच्याच बळावर लढविल्या जातील, असे सांगत खासदार राऊत यांनीही अप्रत्यक्षरीत्या स्वबळाचा नारा दिला.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com