कृषिमंत्री दादा भुसेंनी केली खरीपाची पेरणी! - Agreecultural Minister Dada Bhuse Sow in Farm, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

कृषिमंत्री दादा भुसेंनी केली खरीपाची पेरणी!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 जून 2021

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत खरीप हंगामासाठी समाजातील दुर्बल घटकांना बियाण्यांचे शनिवारी वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या दौऱ्यात चिंचावड (ता. मालेगाव) येथे शेतकऱ्यांची पेरणी सुरू होती. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांनी या शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन स्वतः देखील पेरणी केली.

मालेगाव : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (Food security program) खरीप हंगामासाठी समाजातील दुर्बल घटकांना बियाण्यांचे (Seed Distribution to poor Farmers) शनिवारी वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या दौऱ्यात चिंचावड (ता. मालेगाव) येथे शेतकऱ्यांची पेरणी सुरू होती. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी या शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन स्वतः देखील पेरणी केली. 

कृषिमंत्री भुसे पेरणी करतानाचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला. गेल्या खरीप हंगामात श्री. भुसे यांनी सौंदाणे शिवारातील शेतात नांगरणी केली होती.

श्री. भुसे यांनी आज टेहरे, पाटणे, चिंचावड, आघार खुर्द, नांदगाव, वाके, सौंदाणे, दाभाडी, पिंपळगाव, जळगाव (गा.), बेळगाव, रावळगाव, सातमाने, दुंधे, तळवाडे, पांढरूण, ढवळेश्‍वर, आघार बुद्रुक या गावांतील आर्थिक दुर्बल घटकांसह गरजू शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले. दौऱ्यादरम्यान त्यांना चिंचावड शिवारात पेरणी सुरू असताना आढळल्याने त्यांनी वाहनांचा ताफा थांबवून थेट शेतात जात पेरणी केली. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत खरीप हंगामात कृषी विभागाने सोयाबीन, मूग, बाजरी, मका या पिकांचे बियाणे प्रात्यक्षिक वाटपाचे नियोजन केले आहे. कोरोनाची मरगळ झटकत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीला वेग दिला आहे. यंदाचा खरीप हंगाम चांगला येईल. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसह मागासवर्गीय, विधवा, कोरोनामुळे बाधित झालेल्या कुटुंबासह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोफत बियाणे वाटपासाठी बियाणे वितरण करणाऱ्या कंपन्यांनी सीएसआर निधीतून सामाजिक बांधिलकी जपत बियाणे उपलब्ध करून दिल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी यानंतर झालेल्या बैठकीनंतर दिली. .

श्री. भुसे यांच्या उपस्थितीत शनिवारी टेहेरे, पाटणे, चिंचावड, आघार खुर्द, नांदगाव, वाके, सौंदाणे, दाभाडी, पिंपळगाव, जळगाव (गा.), बेळगाव, रावळगाव, सातमाने, दुंधे, तळवाडे, पांढरूण, ढवळेश्‍वर, आघार बुद्रुक या गावातील आर्थिक दुर्बल घटकांसह गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. श्री. भुसे म्हणाले, की यंदाच्या मृग नक्षत्रात पावसाचे चांगले संकेत आहेत. पेरण्या वेळेवर होतील. त्यामुळे बी-बियाणे आणि शेतीचे साहित्य खरेदी सुरू आहे. राज्यात बियाण्यांसह रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. यंदा युरियासारख्या खताचा ७५ हजार टन बफर स्टॉक आहे. जैविक बीजप्रक्रिया करून उत्पन्नवाढीवर भर द्यावा. पायोनियर, कृषिधन, बुष्टर सीड्स, टाटा रॅलीज, ॲडव्हंटा आणि राशी सीड्स या कंपन्यांनी सामाजिक बाधिलकी जपत शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, संजय दुसाणे, रामा मिस्तरी, चेतन पवार, सुरेश पवार, शशी निकम, अनिल निकम, अविनाश निकम, दीपक मालपुरे, यूपीएल कंपनीचे पंकज पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....
हेही वाचा....

शिवसेनेचा पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख