शिवसेनेचा पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका : संजय राऊत - Don't be surprised if Shiv Sena becomes the Prime Minister: Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करू शकतात हे आंतरराष्ट्रीय सर्व्हे सांगतो, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

जळगाव : शिवसेनेचा पंतप्रधान झाल्यास कुणालाही आश्चर्य वाटू देऊ नका, दिल्ली काबीज करायची असेल तर  जमीन मजबूत करा. देशाला नवीन नेत्याची गरज आहे. उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करू शकतात हे आंतरराष्ट्रीय सर्व्हे सांगतो, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. (Don't be surprised if Shiv Sena becomes the Prime Minister, said Sanjay Raut) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी चोपडा येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. (Shivsena Leader Sanjay Raut) संघटना मजबूत आहेच, तिला अजून भक्कम करायची आहे. कोकणानंतर सर्वाधिक आमदार उत्तर महाराष्ट्रतुन निवडून आले आहेत. माझा दौरा राजकीय नसून कार्यकर्त्यांना भेटायला आलो असेही ते म्हणाले.

यावेळी मंचावर पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार लता सोनवणे,आमदार चंद्रकांत पाटील,आमदार किशोर पाटील,माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे ,संपर्क प्रमुख विलास पारकर आदी उपस्थित होते. (Minister Gulabrao Patil)

संजय  राऊत म्हणाले, मुक्ताईनगरला आमदार चंद्रकांत पाटील यांनी जसा सुरुंग लावून सेनेचा भगवा फडकवला, तसा सुरुंग जामनेरला लावून भगवा फडकला पाहिजे हे आमचे स्वप्न आहे. त्यासाठी मी स्वतः जामनेरला येतो आणि इथे थांबतो. भगवा संपविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना भगव्या झेंड्याच्या दांड्याने गाडा. राज्य सरकारने कोरोना काळात उत्तम काम केले असून उद्धव ठाकरेंमुळे  सर्वांचे मास्क खाली आले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने देखील ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्यात सर्वात जास्त त्रास शिवसेनेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात सेनेचा आमदार असला पाहिजे. माणसात सकारात्मक ऊर्जा पाहिजे, ती आम्हाला बाळासाहेबांकडून मिळाली आहे. लोकांच्या मनात शंका आहे सरकारच काय होणार.? सरकारचं काहीच होणार नाही, सरकार हलवणे कोणालाही परवडणार नाही, असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे चालणारच आहे. ५५ आमदारांचे १००, ११० आमदार करण्यासाठी संघटन वाढवायचं आहे. चोपड्यात आल्यावर कळते तालुक्यात शिवसेना आहे. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे संकटात असतांना देखील त्यांनी पत्नी लता सोनवणे यांना निवडून आणून सेनेचा किल्ला मजबूत केला असे गौरवोद्दगार देखील राऊत यांनी यावेळी काढले.

कोकणच्या धर्तीवरच नुकसान भरपाई

जिल्ह्यात वादळामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ही कोकणच्या धर्तीवरच देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.  येणाऱ्या काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करतांनाच  नेत्यांची निवडणूक संपली आता कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे पाटील म्हणाले.

हे ही वाचा ः जिल्ह्यात काॅंग्रेसचा  आमदार, खासदार नाही म्हणून निराश होऊ नका- मी तुमच्यासोबत..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख