दिल्लीच्या फोनमुळे संदीप गुळवे काँग्रेसमध्ये परतले - Sandip Gulve return in Congress after Delhi Phone call, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीच्या फोनमुळे संदीप गुळवे काँग्रेसमध्ये परतले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

काँग्रेस पक्षापासून दुर गेलेल्या जुन्या नेत्यांना पुन्हा स्वगृही येण्यासाठी थेट दिल्लीहून प्रयत्न होत आहेत. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे यांनाही थेट दिल्लीतून वरिष्ठ नेते सुबोधकांत सहाय यांचा दुरध्वनी आल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये स्वगृही परतले आहेत.

नाशिक : काँग्रेस पक्षापासून दुर गेलेल्या जुन्या नेत्यांना पुन्हा स्वगृही येण्यासाठी थेट दिल्लीहून प्रयत्न होत आहेत. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे यांनाही थेट दिल्लीतून वरिष्ठ नेते सुबोधकांत सहाय यांचा दुरध्वनी आल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये स्वगृही परतले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते अॅड. संदीप गुळवे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला प्रदेशाध्यक्षा चारुलता राव (टोकस), आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या अतिशय वेगवान घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणात तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे इगतपूरी मतदारसंग व तालुक्यात काँग्रेस पक्षाचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यासह जिल्हाभरातील जुन्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

श्री. गुळवे यांनी अनपेक्षितपणे केलेल्या पक्षांतराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जुन्या काँग्रेसच्या शिलेदारांना एकत्रित आणण्यासाठी दिल्लीवरून थेट तशा सूचना आल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींनी राजकीय पुनर्वसनाबाबत गुप्त खलबते बंद दाराआड झालेल्या बैठकीबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटले आहे. मात्र यावर लगेच प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणाचे बाळकडू काँग्रेसच्या मुशीतून मिळालेल्या श्री. गुळवे यांचे पुढील ध्येय ठरलेले दिसते. पुढील राजकीय पुनर्वसन सर्वसामान्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कुतूहालाचा विषय ठरणार आहे. 

श्री. गुळवे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष (कै) गोपाळराव गुळवे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षा इंदुमती गुळवे यांचे चिरंजीव आहेत. स्थानिक पातळीवर आमदारांशी मतभेद झाल्याने २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने श्री. गुळवे यांच्या राजकीय बेरीज वजाबाकीचा धांडोळा मात्र जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन आणेल का याची चर्चा आहे.  

काँग्रेस हे एक राष्ट्रीय विचारधारा व जनतेसाठी त्याग करणारे कुटुंब आहे. आमचे कुटुंब अनेक वर्षे या कुटुंबाच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आले आहे. दिल्लीहून वरिष्ठांनी सूचना केल्याने मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. मला त्याचा आनंद वाटतो. - संदीप गुळवे.
...
 

हेही वाचा... दिल्लीश्वरांना मराठा समाजाचा अंतhttps://www.sarkarnama.in/top-news-mobile-mulakhati-nashik/delhi-government-interested-see-maratha-cast-problem-maratha-issue पाहण्यात स्वारस्य दिसते

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख