रोहित पवारांनी नाशिकसाठी दिले २१ ऑक्सिजन कॅान्सनट्रेटर

कोरोना परिस्थितीत निर्माण झालेली ऑक्सिजनच्या समस्येवर उपाययोजनांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी नाशिक विभागासाठी २१ ऑक्सिजन कॅान्सनट्रेटर महसूल आयुक्तांकडे सुपुर्त केले.
Rohit Pawar
Rohit Pawar

नाशिक : कोरोना परिस्थितीत निर्माण झालेली (To Solve covid19 Oxigen issue) ऑक्सिजनच्या समस्येवर उपाययोजनांसाठी आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी नाशिक विभागासाठी २१ ऑक्सिजन कॅान्सनट्रेटर (Hand Over 21 Oxygen concentrator to Commisiner) महसूल आयुक्तांकडे सुपुर्त केले. 

बारामती अॅग्रो लिमीटेडच्या माध्यमातून आपल्या यशस्वी उद्योजकतेला समाजकार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यातील सातत्य संस्थेचे सीईओ आमदार पवार यांनी कायम राखले आहे. या दृष्टीकोनातून कोरोनाच्या या संकटात बारामती अॅग्रो लिमीटेडकडून हा पायंडा सुरुच आहे. त्याचा एक भाग म्हणून आमदार पवार यांनी राज्यासाठी ५०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपकरणे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानुसार आज (ता.१७) २१ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सुपुर्त केले. 

आपल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आमदार पवार सतत कार्यरत आहेत. मात्र हे प्रय़त्न केवळ आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघापुरतेच मर्यादित न ठेवता राज्यस्तरावरही त्यांनी कोरोनाशी लढा देताना विविध प्रयत्न करत आहेत. सद्यस्थितीत रुग्णांचा वाढता आकडा आणि निर्माण झालेला ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विभागीय आयुक्त व महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णासाठी सुरुवातीच्या काळात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' हे उपकरण प्रभावी ठरते. त्यात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. 

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पुरवण्यात येणा-या या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरमुळे सद्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने आवश्यक असणारी ऑक्सीजनची काही प्रमाणात गरज भागवण्यास मोठी मदत होणार आहे. कोरोनाच्या या संकटमय परिस्थितीत आमदार पवारांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे राज्यातील सर्वसामान्य नागिरकांना दिलासा मिळणार आहे. 

यापूर्वी दुष्काळात मराठवाड्यासह इतर दुष्काळी भागातील तालुक्यांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा केला होता. चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच सांगली व कोल्हापूर महापूराच्या वेळेस शालेय विर्थ्यांसाठी शाळेची दप्तरे तर पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यासह वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. 

संकटात बारामती ऍग्रो तत्पर !
जेव्हा जेव्हा आपत्ती आली त्या त्या वेळेस एक सामाजिक दातृत्वाची जबाबदारी समजून विविध मदतींद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यास बारामती अॅग्रोचे सीईओ आमदार पवार यांची बारामती अॅग्रो लिमीटेड कटीबध्द राहिली आहे. प्रत्येक संकटाच्या काळात त्यांनी सहकार्याची भूमिका बजावली आहे. नाशिक, कन्नड, नारायणपूर, बारामती येथील शासकीय रूग्णालयांसह पुण्यातील ससून रुग्णालयाला वेळवेळी सिरींज पंप, बेबी वॉर्मर, रुग्णवाहिका, सक्शन मशीन, व्हिल चेअर, वॉटर कुलर यासारखी वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. 

असेही सामाजिक दातृत्व...
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कवच म्हणून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणांसह सर्व फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटायझरसह इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या. याकाळात पंढरपूर येथे झालेल्या अतिवृष्टीत पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंसह कोरोनाच्या बचावासाठी सेफ्टी किट पुरवण्यात आले. उत्तराखंड येथे २०१३ मध्ये ढगफुटी झाल्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत कपडे व घरगुती जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. तसेच पुण्याच्या शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट वसाहतीला लागलेल्या आगीच्या वेळेस तेथील बाधित नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. विविध संकटात बारामती अॅग्रो आधारासाठी कायम पुढे सरसावली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, आमदार  सरोजताई अहिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, प्रफुल्ल पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी, विशाल गायकर, कुमार गायधनी, संदेश टिळे आदि उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com