रुग्णसंख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेऊ

शहर व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत करोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊ. त्यानंतर व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : शहर व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत करोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊ. त्यानंतर व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा   मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने श्री. भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला हे आश्वासन  दिले.

ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे नाशिकमधील व्यापार  उद्योग  मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे या पार्श्वभूमीवर व्यापार उद्योग सुरू करण्यासाठी  व व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी संदर्भात  महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मधील व्यापारी संघटनांच्या  शिष्टमंडळाने  आज १६ मे २०२१ रोजी भुजबळ फार्म येथे पालकमंत्री श्री भुजबळ यांची भेट घेतली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. मंडलेचा यांनी दिनांक १३ मे २०२१ रोजी झूम ऍपवर नाशिकमधील व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी पालकमंत्री भुजबळ यांच्या समोर मांडल्या.  त्यात प्रामुख्याने व्यापार सुरु, व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, वीज बिल, मालमत्ता कर, बँक कर्जांवरील व्याज माफ करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या गाळ्यांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करणे, जीएसटी, इन्कम टॅक्स अशा विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठी सप्टेंबर २१ पर्यंत मुदत द्यावी, लघु व मध्यम व्यापाऱ्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या १० टक्के रक्कम वार्षिक ३ टक्के व्याजाने कर्ज रूपाने द्यावे आदि मागण्या केल्या व व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे पालकमंत्र्यांना आवाहन केले.

ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री सुरेश चावला यांनी अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वाहनांसाठी स्पेअर पार्ट्सची दुकाने उघडणे गरजेचे असल्याचे सांगून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. 

बैठकीस महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारणी सदस्य सचिन शहा, अखिल भारतीय मोटर पार्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश आचरा, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश चावला, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, नाशिक किरकोळ किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्रभाई पटेल, नाशिक घाऊक किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, दि नाशिक रिटेल क्लाथ मर्चंट्स असोसिएशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर संपत काबरा, नरेश पारख, तुषार मणियार,   मेहुल थोरात, चेंबरचे सहाय्यक सचिव अविनाश पाठक आदी उपस्थित होते. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com