टोल प्लाझावर मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/chhatrapati-sena-deemands-500-cr-maratha-youth-nashik-politics-77962पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर वाहन चालकांशी अरेरावी आणि असभ्य वर्तन नेहेमीचेच आहे. येथील महिला कर्मचाऱ्यांनी नुकतेच एका युवतीस मारहाण केल्याने त्याची पुन्हा एकदा चर्चा झाली. मात्र येथील दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दादागिरीला टोल प्रशासनाचा पाठींबा असतो. त्यामुळे यासंदर्भात किरकोळ कारवाई न करता येथील दादागिरी कायमस्वरूपी बंद करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली आहे.
NCP Bhamre
NCP Bhamre

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर वाहन चालकांशी अरेरावी आणि असभ्य वर्तन (Employee beating a girl at Pimpalgao toll plaza) नेहेमीचेच आहे. येथील महिला कर्मचाऱ्यांनी नुकतेच एका युवतीस मारहाण केल्याने त्याची पुन्हा एकदा चर्चा झाली. मात्र येथील दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दादागिरीला टोल प्रशासनाचा (Toll Administration supports rude behavior of Employee) पाठींबा असतो. त्यामुळे यासंदर्भात किरकोळ कारवाई न करता येथील दादागिरी कायमस्वरूपी बंद करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने (NCP Women wing deemands)  केली आहे.    

नुकतीच येथे एका युवतीस झालेल्या मारहाण झाली. त्यासंदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधइक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन याबाबत कारवाईची मागणी केली.  

यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. ३१ मे २०२१ रोजी रात्री नऊला शिवसेनेचे बागलाण तालुका प्रमुख डॅा प्रशांत सोनवणे हे नासिकहून सटाणा येथे गावी आपल्या कन्येसह जात होते. पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर टोलचे पैसे देण्यासाठी शंभर रुपयाची नोट प्रशांत पाटील यांनी दिली. यावेळी लाईनमन वर्षा हिरे यांनी नोट फाटलेली आहे, चालणार नाही असे सांगितले. नोट कदाचित काही अंशी फाटलेली आहे या कारणावरून वर्षा हिरे यांनी डॅा पाटील यांच्याशी अरेरावी व उद्धटपणाची भाषा केली. त्याक्षणी कटकट नको म्हणून गाडीत बसलेल्या त्यांच्या कन्येने खाली उतरून समजावून सांगत असतांना लाईनमन वर्षा हिरे आणि वैशाली शिरसाठ यांनी आक्रमक होत तीला अतिशय वाईट पद्धतीने शिविगाळ करीत मारहाण केली.

एका उच्चशिक्षित युवतीस मारहाण झाल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. वास्तविक पाहता आपल्या मुलीच्या वयाच्या असलेल्या युवतीस मारहाण करणे दोन्ही लाईनमनला अशोभनीय होते. त्यांना तसा अधिकार देखील नाही. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ह्या टोलवर नेहमीच कटकटी होत असतात. माजी आमदार आणि लोकप्रतिनिधींशी ही ह्या टोलवर अनेकदा हुज्जत घालण्यात आली आहे. 

महिलांना रोजगार मिळावा म्हणून टोलवर नोकरी दिली जाते असे टोल प्रशासनाची भूमिका  आहे. मात्र येथील महिला अतिशय उर्मट व दादागिरीची भाषा करतात. ह्या महिलांच्या अशा वर्तनाला टोल प्रशासनाचाच पाठिंबा असतो. महिलांशी हुज्जत नको म्हणून अनेकदा वाहनधारक शांत बसतात. याचाच परिणाम म्हणजे आता वाहन धारकांना मारहाण करण्यापर्यंत कर्मचाऱ्यांची जल गेली आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आपल्या मागणीत टोल प्रशासनातील सर्व कर्मचारी वर्गाचे चारित्र्य पडताळणी पोलिस विभागामार्फत करण्यात यावे. लाईनमन वर्षा हिरे व वैशाली शिरसाठ यांच्यावर कायदा व सुव्यवस्था अंतर्गत गुन्हा दाखल करावा. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून टोल प्रशासनाकडून वाहनधारकांना सहकार्य करण्याचे व सौजन्याने वागण्याचे हमीपत्र घ्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.   

यासंदर्भात अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्षा भामरे, विभागीय अध्यक्षा सरिता पगारे, उपाध्यक्षा मिनाक्षी काकळीज, सरचिटणीस योगिता आहेर, संगिता घाडगे आदी महिला उपस्थित होत्या.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com