आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ५०० कोटी द्या! - Chhatrapati sena deemands 500 cr for Maratha Youth, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला ५०० कोटी द्या!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

मराठा समाजातील युवकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाने यापूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. यासंदर्भात येथील छत्रपती सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. 

नाशिक : मराठा समाजातील युवकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाने यापूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी (Government should fulfill Assurance given to Maratha Community) करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. (Avail sufficient funds to Patil Corporations) यासंदर्भात येथील छत्रपती सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्यामार्फत शिवसेना नेते मंत्री अनिल देसाई यांची भेट घेण्यात आली. मराठा समाजाच्या युवकांच्या या ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच या मागणीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. 

करोनामुळे जवळ जवळ प्रत्येक कुटुंबातील सदस्याची नोकरी गेली आहे. त्यांच्या व्यवसायापुढे संकट उभे राहीले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना समाजातील तरूण उदरनिर्वाहासाठी नवा मार्ग शोधत आहेत. या आव्हानात्मक स्थितीत बेरोजगार युवकांना आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे कोरोनापश्चात स्थितीत या महामंडळासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी. राज्यातील बेरोजगारांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.

प्रातिनिधीक स्वरूपात नाशिकचा विचार करता सद्यस्थितीत या महामंडळाकडून कर्जस्वरूपात आर्थिक मदतीच्या अपेक्षेत असणाऱ्या तरूणांची संख्या सुमारे ८ हजार आहे. केवळ नाशिकसाठी १३ कोटींचा शिल्लक निधी आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांकरीता अवघी ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. छोटेखानी व्यवसाय-उद्योगांकरीता तरूणांना शासनाकडून कर्जपुरवठा होताना संपूर्ण राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी ५० कोटी रूपये ही तरतूद अतिशय तुटपूंजी आहे. त्यासाठी किमान ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्याची गरज आहे.

या महामंडळाच्या योजनेचा लाभ राज्यातील असंख्य मराठा समाजातील तरूण घेत आहेत. त्यांच्या आरक्षणाचा विषय सरकार व न्यायालयात प्रलंबीत  आहे. त्यांना काळाच्या ओघात न्याय मिळेल, तोपर्यंत स्वयंरोजगार व उद्योग उभारण्यासाठी मदत गरजेची आहे. आरक्षणासाठी सरकारला कायदेशीर मर्यादा पडत असतील तरीसुध्दा महामंडळाकरीता पुरेशा अर्थपुरवठ्याची तजवीज करणे अशक्य नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ५०० कोटी रूपयांची तरतूद करावी, अशी मागणी छपत्रती सेनेतर्फे करण्यात आली

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष चेतन शेलार, निलेश शेलार, उपाध्यक्ष डॉ जयेंद्र थविल, वैद्यकीय आघाडी प्रमुख  डॉ. शाम थविल उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

विकासकामांत भाजपचा कायमच खोडा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख