मोहन भागवत म्हणाले, `सरकारी रुग्णलयावर लोकांचा विश्वास नाही` - People doesn`t have faith on Government hospitals, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मोहन भागवत म्हणाले, `सरकारी रुग्णलयावर लोकांचा विश्वास नाही`

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

सरकारी रुग्णलयावर लोकांना विश्वास नाही.  काहींना अनुभव आहे तर काही त्याबाबतच्या चर्चेमूळे तीथे जात नाहीत. सरकारी रुग्णलयाची आजची अवस्था फार वाईट नाही, तेथे देखील चांगले उपचार केले जातात. मात्र या रुग्णालयांची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे.

नाशिक : सरकारी रुग्णलयावर लोकांना विश्वास नाही.  (People doesn`t have faithfulness on Government hospitals) काहींना अनुभव आहे तर काही त्याबाबतच्या चर्चेमूळे तीथे जात नाहीत. (Some had experience and some don`t go because of disputation) सरकारी रुग्णलयाची आजची अवस्था फार वाईट नाही, तेथे देखील चांगले उपचार केले जातात. मात्र या रुग्णालयांची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) म्हणाले. 

आयुर्वेद व्यासपीठ संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या चरक भवन वास्तुचे त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. यावेळी कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ते म्हणाले, आयुर्वेदामुळे उपचारास विलंब लागतो हा गैरसमज आहे. उपचार हा औषधांच्या मात्रेवर अवलंबून असतो. स्वस्त व सुलभ उपचाराला महत्व देत, निरामय आरोग्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पॅथीचे आदानप्रदान झाले पाहिजे. प्रत्येक पॅथीमध्ये संशोधन झाले पाहिजे. आयुर्वेद पॅथीने त्यासाठी पुढाकार घ्यावा. 

ते पुढे म्हणाले की, कोरोनानंतर अनेक बाबीचा फेरविचार करावा लागतो आहे. वैद्यकीय क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. श्वसनविकारासाठी अनेक आयुर्वेदीक काढे उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुर्वेदात स्वस्तात उपचार केला जातो. सरकारी रुग्णालयाची अवस्था फार वाईट नाही, चांगले उपचार केले जातात. पण तरीही सरकारी रुग्णालयावर लोकांचा विश्वास नाही. काहींना अनुभव आहे तर काही याविषयीच्या चर्चेमूळे जात नाहीत. इलनेसचा विचार सर्व पॅथींनी केला, पण वेलनेसचा विचार फक्त आयुर्वेदाने केला.

आपण परिवर्तन करत असतो, जिंकणे हा हेतू नसतो, आयुर्वेदाने यासंदर्भात नेतृत्व करावे. अनेक वेळा नाव आणि झेंडा कुठला यावरून वाद होतात, म्हणून लोक एकत्र येत नाहीत. अशा परिस्थितीत आयुर्वेदाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. इतर देशही त्याचे अनुकरण करतील. आयुर्वेद फक्त आपल्याकडे आहे, भारताबाहेर नाही. या बदलासाठी संघटन महत्वाचे आहे.

`या`साठी संघटन महत्त्वाचे
डॉ. देवपुजारी म्हणाले की, कुठलेही शासन परिस्थिती बदलू शकत नसतं. परिस्थिती बदल आणि परिवर्तनासाठी संघटन महत्वाचे असते. आयुर्वेदाला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. आयुर्वेदात खूप काही आहे. आयुर्वेद व्यापक आहे. त्याला आपण मोठ करु शकत नाही पण त्याचा अंगीकार करुन आयर्वेदासोबत आपण निश्चित चालू शकतो. आशासाठीच संघटन महत्वाचे आहे. 

तत्पूर्वी डॉ.भागवत यांच्या हस्ते ॲनालाईनने चरक भवनाचे लोर्कापन झाले. यावेळी कोरोना काळात चांगले कामकाज केल्याबद्दल विविध वैद्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी अखिल भारतीय चिकित्सा पध्दती संस्थेचे  (एनसीआयएसएम) अध्यक्ष डॉ. जयंतराव देवपुजारी, आयुर्वेद व्यासपीठ संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष नेवपुरकर, विनय वेलणकर, वैद्य रजनी गोखले, विलास जाधव आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

लशीसाठी नागरिक झिजवताहेत नेत्यांचे उंबरठे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख