लशीसाठी नागरिक झिजवताहेत नेत्यांचे उंबरठे

शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत अवघे २५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना झालेले लसीकरण पुरेसे नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केले जात आहे. त्यामुळे लस हवी तर नागिरक अक्षरशः राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत.
Vaccination nashik
Vaccination nashik

नाशिक : शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत अवघे २५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. (Only 25% vaccination till now in Nashik) कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना झालेले लसीकरण पुरेसे नसल्याचे (Vaccination is not sufficient says expert) मत वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केले जात आहे. त्यामुळे लस हवी (For Vaccination people running behind political leaders)तर नागिरक अक्षरशः राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत.

नाशिक शहरामध्ये १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाकडून महापालिका व ग्रामीण भागामध्ये लशीचा पुरवठा करण्यात आला. प्रारंभी सरकारी कार्यालयातील कर्मचारी, आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वयोगटांपुढील सर्व व्यक्तींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले.

निर्णयात दुरुस्ती करत ४५ वयोगटापुढील सर्व व्यक्तींना लस देण्याची घोषणा करण्यात आली. १ मे २०१९ पासून १८ वयोगटापुढील सर्वांनाच लस देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, लशीचा अपुरा पुरवठा होत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा लागला. केंद्र व राज्य शासनाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. लसपुरवठा नेमका कोणी करायचा व त्याचे वितरण कसे करायचे, याबाबत नियमावली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर केंद्र सरकारने ७५ टक्के लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लसीकरण मोहीम सुरळीत झाली. ज्या व्यक्तींची नोंदणी कोव्हिन ॲपवर होते त्यांनाच लस दिली जाते. केंद्र सरकारने कारभार हाती घेतला तरी लशीचा पुरवठा मात्र सुरळीत होत नाही. वीस लाख लोकसंख्या गृहीत धरल्यास ही टक्केवारी अवघी २५ टक्के आहे. 

कोव्हॅक्सिनचे ७० हजार डोस 
शहरात पहिला डोस घेणारे तीन लाख ७७ हजार ६०४ नागरिक असून, दुसरा डोस घेतलेले एक लाख १७ हजार १४३ लोक आहेत. मागील दोन दिवसांत पाच लाख दोन हजार ७४७ नागरिकांना डोस देण्यात आले. नाशिककरांची पसंती कोव्हिशील्डलाच असून, पहिला डोस घेतलेले तीन लाख ३७ हजार ५८६, तर दुसरा डोस घेतलेले ८६ हजार ३२९ नागरिक आहेत. कोव्हिशील्डचे एकूण चार लाख २३ हजार ९१५ डोस झाले आहेत. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेले ४० हजार १८ नागरिक असून, ३० हजार ८१४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचे एकूण ७० हजार ८३२ डोस झाले आहेत. 

केंद्रे भरपूर, लस मात्र नाही 
महापालिकेकडून शहरात ४१ लसीकरण केंद्रांची घोषणा करण्यात आली, मात्र आजी-माजी नगरसेवकांकडून केंद्रांची मागणी वाढली. सध्या ११० केंद्रांना मान्यता देण्यात आली असली तरी जेवढ्या लशी उपलब्ध होतील त्याचे समान वितरण करूनच मोहीम राबविली जाणार असल्याने एका केंद्रावर साधारण ५० ते १०० लस उपलब्ध होत आहेत. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com