बोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’ 

मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील गंभीर पाणीप्रश्नाबाबत ठोस निर्णय न झाल्याने शहरवासीयांची निराशा झाली.
Gulabrao Patil
Gulabrao Patil

बोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city) या बैठकीत शहरातील गंभीर पाणीप्रश्नाबाबत ठोस निर्णय (No decision on water issue in this meeting) न झाल्याने शहरवासीयांची निराशा (Citizen upset on the role of Guardian Minister) झाली. 

मागील आठवड्यात १९ जुलैला शहरातील पाणी समस्येबाबत नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले होते. त्यावर ओझरखेडा धरण येथून तात्पुरती पाणीपुरवठा योजनेला तत्त्वत: मान्यता मिळाली, परंतु शनिवारी तालुक्यात प्रत्यक्ष पालकमंत्री आले असता तशी कोणतीही घोषणा झाली नाही. ८१ गाव ओडीओ योजनेची नवीन जलवाहिनी सिरसाळ्यासह परिसरात पूर्ण झाली आहे. तिचे परिक्षण करून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, पुढे रेल्वेरुळ ओलांडून जलवाहिनी बोदवड शहरात कशी येणार, हा प्रश्‍न सुटलेला नाही. 

ओझरखेडा येथून येणारी जलवाहिनी किती दिवसात होणार? कशी होणार? शहरवासीयांना पाणी कधी मिळणार? प्रस्ताव तयार केला की नाही? याबद्दल कोणतीही ठोस माहिती वा घोषणा आढावा बैठकीत झाली नाही, तसेच तालुका आढावा बैठकीत आरोग्य विभाग उपकेंद्रात पूर्णवेळ कर्मचारी हजर राहावेत, असे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले.
रिक्त वैद्यकीय जागांवर पर्यायी व्यवस्था करणार, घरकुलप्रकरणी गावठाण अतिक्रमिताना जागा घेण्यास ५० हजार देणे अथवा राहत असलेली अतिक्रमित जागा नमूना आठ करून प्रत्येकाला घरकुल उपलब्ध करून द्यावा, मागेल त्याला गोठा देण्यात यावा, प्रत्येक ग्रामसेवकाला अपंग पाच टक्के निधी वाटप करून घ्या, असे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. 
 

पूर्णवेळ शुवैद्यकीय अधिकारी
पशुवैद्यकीय अधिकारी २०१२ पासून नाही. प्रभारी अधिकाऱ्यांनी आपली सेवा पूर्णवेळ द्यावी तसेच रिक्त जागांवर नियुक्ती करण्यात येईल, यासह तालुक्यातील नागरिकाच्या प्रश्न सोडवत प्रशासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात आल्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नगरविकास विभागातून आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये २० लाख निधी मंजूर रस्ता, जिजाऊ बाल उद्यान सुशोभीकरण २५ लाख, विद्याकालनी रस्ता २० लाख निधी या तिन्ही विकासकामांचे उद्‌घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी आमदार चंद्रकांत पाटील, नगराध्यक्ष मुमताज बागवान, नगरसेवक विजय पालवे, आमदार पाटील, देवेंद्र खेलकर, नितीन चव्हाण, सुनील बोरसे, डॉ. सुधीर पाटील, तालुकाप्रमुख गजानन खोडके, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, दीपक माळी, वीरेंद्रसिंह पाटील, सुनील पाटील यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com