खरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का?

कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीनुसार नाशिकने सावध असावे.
Nashik Flood f
Nashik Flood f

नाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and sarrounding districts badly affected by heavy rains) ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीनुसार नाशिकने सावध असावे. (From this incidents of flood nashik administration should be prepare) धरणे भरल्यानंतर सप्टेंबरमध्ये गोदावरीला पूर येतो. (There was a history of floods in Godawari bank in the month of september) पावसाचा तडाखा पाहता येणाऱ्या संभाव्य पुराचा धोका ओळखून आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज असावे. त्याबाबत प्रशासन सावध आहे ना? याची खातरजमा झालेली असावी. 

दर वर्षी ही यंत्रणा जशी सज्ज असते, त्यापेक्षा अधिक सज्जता या वेळी बाळगावी लागेल. गोदावरीला २००८ मध्ये आलेला महापूर हा ४० वर्षांनंतरचा सर्वांत भीषण महापूर होता. या महापुराने प्रचंड हानी झाली. सरकारवाड्यापर्यंत तेव्हा पाणी शिरले होते, सराफ बाजार पूर्ण पाण्याखाली होता. २००८ नंतर २०१६ आणि २०१९ मध्येही नाशिकने महापुराचा सामना केला. या पुरांच्या वेळीदेखील आपत्कालीन यंत्रणा होती, पण ती अपुरी पडत होती. गोदावरीला पूर आल्यानंतर निफाड तालुक्याला सर्वाधिक फटका बसतो. तेथे पुरात निर्माण होणाऱ्या समस्या २५ वर्षांपासून जैसे थे आहेत. निफाडमधील साधारण ३० किलोमीटर परिसरातील गावांचा यात अग्रक्रमाने विचार व्हायला हवा. दारणा-गोदावरीचा संगम दारणा सांगवीला होतो, तिथून पुढे महापुराचा सर्वाधिक फटका बसतो. या गावांत वऱ्हेदारणा, चाटोरी, चांदोरी, सायखेडा, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, कोठुरे, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, कुरडगाव ही गावे प्रामुख्याने येतात. या गावांमध्ये काय उपाययोजना करता येतील, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने आत्तापासून करायला हवे. 

पाणवेलीचा प्रश्‍न हा अत्यंत गंभीर आहे. सध्यादेखील पाणवेलींमुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. कोठुरे-करंजगाव आणि सायखेडा-चांदोरी या दोन्ही पुलांची उंची कमी आहे. या पुलात पाणवेली मोठ्या प्रमाणात अडकतात, त्यामुळे पुराचा विस्तीर्ण फुगवटा तयार होतो, शेकडो एकर शेतजमीन त्यामुळे पाण्याखाली जाते, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. पाटबंधारे विभाग ही पाणवेली काढण्याचे काम दर वर्षी करत असूनही या स्थितीत गेल्या २५ वर्षांत सुधार झालेला नाही. पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण झाल्यावर एक-दोन दिवस पाणी वाहते केले जाते. पण, पाणवेलींमुळे पुन्हा तीच स्थिती होते. यावर ठोस उपाययोजना व्हायला हवी. गेटमधून पाणी सोडण्याचे अचूक नियोजन पाटबंधारेकडून अपेक्षित आहे. अनेकदा हे नियोजन चुकते. हे काम संवेदनशीलतेने करायला हवे. ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून किंवा चांदोरीसारख्या लहान गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या धर्तीवर प्रत्येक गावात युवकांना आरोग्यासह आपत्तीचे प्रशिक्षण देत गट तयार व्हायला हवेत.

त्यामुळे प्रशासनावरील भार हलका होऊ शकेल. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील नौकायन करणाऱ्या प्रशिक्षित तरुणांची टीमदेखील आपत्कालीन स्थितीसाठी नेहमी सज्ज असते, हीदेखील एक कौतुकास्पद बाब आहे. 

आतापासून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा पूर्ण अभ्यास होऊन सराव सुरू व्हायला हवा. शेतमजुरांना योग्य वेळी स्थलांतरित करायला हवे. पाण्यासाठी नदीत सोडलेल्या विजेवर चालणाऱ्या मोटारी बंद करण्याच्या सूचना त्वरेने देण्याची यंत्रणा विकसित व्हावी. गोदा, दारणेत येऊन मिळणारे केमिकलयुक्त पाणी तातडीने बंद व्हावे, कारण हे पाणी नाशिक, नगर, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांसाठी तसेच कोपरगाव, राहता, येवला, वैजापूर, शिर्डी या पाच नगर परिषदांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी यात लक्ष घालावे. एकूणच जिल्ह्याची आपत्कालीन यंत्रणा केवळ नावापुरती राहू नये, त्यांनी पूर्ण क्षमतेने सज्ज व्हावे, सावध असावे.  
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com