नाशिक महापालिकेत ठेकेदारांचे राज्य आहे?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला टप्प्याटप्प्यावर शिवसेनेकडून घेरले जाते. मात्र आता भोजन ठेक्याच्या निमित्ताने भाजपला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर उलटवार करण्याची संधी मिळाली आहे.
NMC
NMC

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला टप्प्याटप्प्यावर शिवसेनेकडून घेरले जाते. (Shivsena counters BJP in NMC) मात्र आता भोजन ठेक्याच्या निमित्ताने भाजपला (Food contract issue) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर उलटवार करण्याची संधी मिळाली आहे. भोजन ठेक्यात शिवसेनेच्या दोन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या नातेवाइकाचा संबंध येत असल्याने आगामी निवडणुकीत (Politics on Upcoming Shivsena) ठेक्यावरून भाजपवर आरोप करणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची आयती संधी मिळाली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून महासभा, स्थायी समिती किंवा अन्य विषय समित्यांमध्ये मंजूर झालेल्या विषयावरून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपने कुठलाही विषय मंजूर केल्यास त्या विषयाला तांत्रिक बाबींत अडकून राज्य शासनाकडून तो ठराव एक तर विखंडित करायचा किंवा मंत्र्यांकडून शिफारस करून तो विषय मंजूर होऊ द्यायचा नाही. 

न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे किंवा स्थानिक पातळीवर अडसर निर्माण करून तो विषय मंजूरच होऊ नये, असे प्रयत्न करायचे, अशी खेळी शिवसेनेकडून खेळली जात आहे. वास्तविक भाजपची सत्ता असताना इथल्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वी हेच उद्योग केले होते. तोच फॉर्म्युला शिवसेनेकडून राबविला जात आहे. 

भाजपला विविध विषयावरून घेरताना महापालिकेत ठेकेदारांचे राज्य आहे, ठेकेदारच महापालिका चालवतात, असा आरोप सातत्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातो. मात्र आता भोजन पुरवठ्याचा आगाऊ पाऊण कोटीचा ठेका मंजूर करताना, शिवसेनेच्या नाशिक रोड विभागातील दोन विद्यमान नगरसेवकांची नावे पुढे येत असल्याने आता शिवसेनेचीच कोंडी झाली आहे.

राष्ट्रवादी अडचणीत?
नवीन बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात चहा, नाश्ता व भोजन पुरविण्यासाठी शिवसेनेच्या एका विद्यमान नगरसेवकाला व त्याला भागीदार असलेल्या एका नगरसेवकाच्या भावाने यापूर्वी काम घेतले आहे. आता पुन्हा त्यातील एकाला भोजन पुरवठ्याचा ठेका मिळाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक विद्यमान पदाधिकाऱ्याचा भाचा व माजी नगरसेविकेच्या पुत्राचाही या ठेक्‍यात समावेश असल्याने महाविकास आघाडीकडून आगामी निवडणुकीत प्रचार करताना भाजप व कुठल्या तोंडाने चिखलफेक करेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com