लूट करणाऱ्यांना मोकळीक, दाद मागणाऱ्यांवर गुन्हे

आम आदमी पक्षातर्फे झालेल्या अर्धनग्न अवस्थेतील आंदोलनाबाबत मुंबई नाका पोलिसांनी प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांची कारवाई म्हणजे, चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याचा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला.
AAP Bhave
AAP Bhave

नाशिक : आम आदमी पक्षातर्फे झालेल्या अर्धनग्न अवस्थेतील आंदोलनाबाबत मुंबई नाका पोलिसांनी प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई केली आहे (Police took action against Jitendra Bhave for Unloathing agitation). दरम्यान, पोलिसांची कारवाई म्हणजे, चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याचा (Police action is save Thief and action on asking foe justice) आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला. आंदोलनानंतर पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे, राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे (Dhanajay Shinde Blaim) यांनी पत्रकार परिषद घेत पोलिस कारवाईचा निषेध करीत, रुग्णाची अनामत रक्कम परत मिळालीच नसल्याचा आरोप केला.

श्री. भावे म्हणाले, की रुग्णालयांनी अनामत रकमा घेऊ नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत आहेत. वोक्हार्ट रुग्णालयाने घेतलेली अनामत रक्कम परत मिळण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे रुग्णालयाशी संपर्क साधला. रुग्णांकडून दहा लाखांचे बिल आकारल्यानंतर पुन्हा अनामत रक्कम देत नसल्याने त्याविरोधात दाद मागायला गेल्यावर स्वतःच्या अंगावरील कपडे काढून रुग्णांना नागावलेपणाची प्रतीकात्मक स्थिती चव्हाट्यावर आणणारे आंदोलन केले. पोलिसांनी अनामत रक्कम गिळंकृत करू पाहणाऱ्या रुग्णालयाऐवजी न्याय मागणाऱ्या कार्यकर्त्याला सात तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. लूट, अन्याय करणाऱ्यांना मोकळीक, तर न्याय मागणाऱ्यांवर गुन्हे ही पोलिसांची भूमिका अन्याय करणारी आहे.
महापालिका करणार चौकशी

नागरिकांनी भावे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी भावे यांचे आंदोलन कायदेशीर मार्गाने होते का, याची चाचपणी महापालिकेकडून होणार आहे. महापालिकेने लेखापरीक्षक नेमले आहेत. लेखापरीक्षकाकडे रीतसर अर्ज भावे यांनी केला होता का, याची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णालय दोषी आढळल्यावरही कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकाकडे बिले तपासणीचा अर्ज केला होता का, अर्ज न करताच आंदोलन केले का, या सर्व प्रकरणाची मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात रुग्णालय प्रशासन दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलन करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब झाला नसेल तर त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे. आंदोलन प्रकरणातील दोन्ही बाजू तपासणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

आंदोलन कायमच
सर्वसामान्यांना आरोग्य-शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. तो सामान्यांचा हक्क आहे. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आरोग्यावर अवघी ३ टक्के तरतूद आहे. अपुऱ्या सरकारी व्यवस्थेमुळे लोकांचे जीव जात असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी यापुढेही आम आदमी पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
-धनंजय शिंदे, राज्य सचिव, आम आदमी पक्ष
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com