लसीकरण नव्या व्हेरियंटसमोर किती प्रभावी ठरेल?

कोविड-१९ चा फैलाव गेल्या वर्षी चीनपासून सुरू झाला. जागतिक प्रवासाच्या सोयींमुळे तो सगळ्या जगात पसरला. मात्र ही बाब एका व्हायरसची नाही, स्वरूप बदलून तो पुन्हा पसरत राहतो. यालाच ‘म्युटंट व्हेरियंट’ म्हटलं जातं. त्यावर केवळ लसीकरण कितपत प्रभावी ठरेल हा तज्ञांत चर्चेचा विषय आहे.
mutant
mutant

नाशिक : कोविड-१९ चा फैलाव गेल्या वर्षी चीनपासून सुरू झाला. (Covid19 spread all over world from China) जागतिक प्रवासाच्या सोयींमुळे तो सगळ्या जगात पसरला. मात्र ही बाब एका व्हायरसची नाही,  (This is not just single Virus)  स्वरूप बदलून तो पुन्हा पसरत राहतो. यालाच ‘म्युटंट व्हेरियंट’ (will vaccination is sufficient for Mutant Varient) म्हटलं जातं. त्यावर केवळ लसीकरण कितपत प्रभावी ठरेल हा तज्ञांत चर्चेचा विषय आहे.  

पुढच्या व्हायरसचं स्वरूप नेमके कसं राहील, याचा केवळ अंदाजच बांधता येऊ शकतो. पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट अधिक घातक असेल, असं काही तज्ज्ञांनी आधी वर्तवलं असलं, तरीदेखील त्यांना खात्रीपूर्वक तेव्हाही सांगता आलं नव्हतं. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेबाबतही केवळ भाकीतं वर्तवली जात आहेत. काही म्युटंट झालेले व्हायरस अधिक घातक बनतात, तर काही सौम्य राहतात.

जगभरातील व्हेरियंटमध्ये ब्रिटनमधील केंट म्युटंटची चर्चा खूप झाली. या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले होते. त्याचप्रमाणे ब्राझील, दक्षिण आफ्रिका इथले व्हेरियंटही घातक ठरले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा व्हेरियंटही त्रासदायक ठरला. गेल्या ऑक्टोबरपासून आपल्या देशात धुमाकूळ घालणारा व्हेरियंट आता जगासाठी मोठी आपदा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘बी वन पॉइंट सिक्स वन सेव्हन’ हे नामकरण भारतीय व्हेरियंटचं करण्यात आलंय. भारतात हा व्हेरियंट पसरण्यासाठी उत्तर प्रदेशातील कुंभमेळा आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या प्रचारसभा प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. भारताबाहेर जाणाऱ्या प्रवाशांमुळे हा व्हायरस अन्य देशांमध्येही पसरला. सध्याच्या आकडेवारीनुसार ४४ देशांमध्ये हा व्हेरियंट आढळल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

ब्रिटन आणि अमेरिकेतही हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या भारतीय व्हेरियंटचं सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे तो वेगाने पसरतो. जसा यूकेचा केंट व्हेरियंट अधिक पसरला, तसाच हादेखील असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आकडेवारीत सांगायचं, तर ओरिजनल कोविड-१९ व्हायरसपेक्षा म्युटंट झालेला हा व्हेरियंट ६० ते ७० टक्के अधिक पसरतो. संक्रमणाचं प्रमाण अधिक असल्याने अधिक लोक आजारी पडतात. या म्युटंटसमोर आधी वापरलेली स्टेरॉईड्स किती काम करत आहेत, यावर संशोधन सुरू आहे. कारण या औषधांच्या माऱ्याला व्हायरस कसा प्रतिसाद देतो, यावर आता औषधोपचारांची पुढची दिशा ठरेल. लसीकरण या नव्या व्हेरियंटसमोर किती प्रभावी ठरेल, याचाही अभ्यास सध्या संशोधक करत आहेत.

भारतीय व्हेरियंटला व्हीओसी अर्थात, ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये दुसरी लाट थोपविण्यात यश आलं आहे. तेथे अनेक दिवसांपासून शाळादेखील सुरू झाल्या आहेत. तिथे मुलांना शाळेत मास्क आवश्यक करण्यात आला आहे. एकूणच अनलॉकची स्थिती ब्रिटनमध्ये आहे, बाजारपेठा खुल्या होत आहेत. इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू होत आहेत. रेस्टॉरंट, हॉटेलही पुढच्या एक-दोन दिवसांत सुरू होतील. मात्र बोल्टन, लंडन इथे भारतीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात, तिथे सध्या भारतीय व्हेरियंट पसरतोय. त्यामुळे ब्रिटन चिंतेत आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये भारतीय व्हेरियंटचे तीन म्युटंट आढळून आले आहेत. त्यामुळे तिथे प्रशासन जपून पावलं टाकत आहे. शाळेतील मुलांच्या माध्यमातून भारतीय व्हेरियंट अधिक प्रमाणात पसरल्यास पुढची लाट पसरू शकते, ही त्यामागची मुख्य भीती वर्तवण्यात येत आहे.

आपल्याकडे देखील यापुढच्या काळात सार्वजनिक व्यवहार करताना अधिक काळजी घ्यावी लागेल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लॉकडाउन यशस्वी करणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जेव्हा आपण बाहेर पडू, तेव्हा सार्वजनिक स्थळी मास्क बंधनकारक राहील. कोणत्याही प्रकारची लक्षण आढळून आल्यास लगेचच उपचार सुरू करून विलगीकरणात राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या कोणत्याही म्युटंटचा संसर्ग रोखता येणं शक्य होऊ शकेल. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सहाव्या-सातव्या दिवशी गंभीर लक्षण असल्यास पुढची उपचारांची दिशा ठरवणं योग्य ठरतं. एकमेकांच्या घरी जाणं टाळणंही सध्या सयुक्तिक आहे. दोन व्यक्तींमधील सहा फुटांचं अंतर पाळायला हवं. त्यामुळेच आपण वाचू शकू, संक्रमण कमीत कमी होईल. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण काही प्रमाणात का होईना, आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नातून कमी होऊ शकतो; अन्यथा आत्ता निर्माण झालेल्या स्थितीपेक्षा अधिक गंभीर परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागेल, हे सांगण्यासाठी कोणाही भविष्यवेत्त्याची गरज भासू नये, एवढंच...
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com