कोविड रुग्णालयात तोडफोड करून भाजप नेता फरारी 

येथील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पतीन व भाजपचे नेते राजेंद्र काजणे यांनी शनिवारी रात्री महापालिकेच्या बिटको कोविड सेंटरमध्ये कार घुसवून तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना शिविगाळ, दमबाजी केली. त्यानंतर मात्र ते फरारी झाले.
Bytco
Bytco

नाशिक : येथील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पतीन व भाजपचे नेते राजेंद्र काजणे (BJP leader Rajendra Tajne) यांनी शनिवारी रात्री महापालिकेच्या बिटको कोविड सेंटरमध्ये (Bjp Corporator Seema Tajne`s Husband attck with car on bytco Covid Hospital) कार घुसवून तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना शिविगाळ, दमबाजी केली. त्यानंतर मात्र ते फरारी (He Abscond After Attack) झाले.

दरम्यान पोलिसांनी मोबाईल ट्रॅकींगद्वारे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, वावी (ता. सिन्नर) येथे त्यांचे लोकेशन सापडले. पोलिसांनी घटनेत वापरलेली इनोव्हा कार देखील वावी येथून ताब्यात घेतली आहे. 

नगरसेविका ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी आपली इनोव्हा कार रॅम्पवरून पोर्चमध्ये नेली. नंतर थेट काचेच्या दरवाजाला वेगात धडकवली. तसेच आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केली, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर रुग्णालयातील कोरोना रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकातं दहशत निर्माण झाली. सर्व कर्मचाऱ्यांना काय घडते आहे, हे समजत नव्हते. त्यांनी रुग्णालयाच्या एका खोलीत शिरून कडी लावून घेतली.

घटनेनंतर महापौरांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नाशिक रोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला. बिटकोच्या आवारात काचांचा खच पडला होता. या सर्व घटनेची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॅार्ड झाली. त्यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. 

औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन व अन्य वैद्यकीय साधनांच्या टंचाईवरून निष्काळजीपणा, दुरवस्था, अस्वच्छता यामुळे उद्विन होऊन ताजणे यांनी हे कृत्य केल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.  महिनाभरापूर्वी प्रकृती चिंताजनक असल्याने ताजणे यांचे वडील बिटकोत दाखल झाले होते. नंतर त्यांचे निधन झाले. त्याचा राग मनात धरून त्यांनी हे कृत्य केले असावे, असाही अंदाज त्यांच्या समर्थकांनी केला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र त्याचा इन्कार केला.

मित्रमेळा या संघटनेचे अध्यक्ष असलेले ताजणे हे एका साथीदारासह इनोव्हा कारमधून आले. कार रॅम्पवर चढवून पोर्चमध्ये वेगात आणली. त्यामुळे तेथे असलेले तीन सुरक्षारक्षक जीव मुठीत धरून पळाले. त्यानंतर त्यांनी काचेचे प्रवेशद्वार तोडून कार आत घुसवली. नंतर खाली उतरले व शिवीगाळ केली. तसेच दगड फेकला व काही लोकांना मारहाण केली आणि नंतर सिनेस्टाइलने कार फिरवत तेथून निघून गेल्याचे उपस्थितांनी सांगितले. या वेळी रुग्ण, त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, या घटनेमुळे रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, बिटकोत रुग्णांच्या नातेवाइकांकडून कर्मचारी, डॉक्टरांवर हल्ले वाढले आहेत. काही चमकोगिरी करणारे नेते येथे येऊन दादागिरी करतात. अधिकारी, आयुक्त, मंत्री, नेते भेट देतात. परंतु कोणीच बिटकोची समस्या सोडवत नाही, अशी तक्रार या वेळी येथील कर्मचाऱ्यांनी केली. महापौर सतीश कुलकर्णी, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, पोलिस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, विभागीय अधिकारी संजय गोसावी, डॉ. जितेंद्र धनेश्‍वर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महापौर कुलकर्णी यांनी कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.
---
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com