जळगाव महापौरपदी आज कोण बाजी मारणार..भाजप नगरसेवक फुटल्याने निवडणुकीत रंगत - Online voting for the post of Mayor and Deputy Mayor of Jalgaon Municipal Corporation today | Politics Marathi News - Sarkarnama

जळगाव महापौरपदी आज कोण बाजी मारणार..भाजप नगरसेवक फुटल्याने निवडणुकीत रंगत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मार्च 2021

भाजपचे 31 नगरसेवक फुटल्याने शिवसेना विरूद्ध भाजप अशी चुरस असून यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.  

जळगाव : "खेला होबे" अर्थात खेळ तर होणारच हा शब्द बंगाल विधानसभा निवडणुकीत गाजतो आहे. जळगाव महापौर निवडीतही भाजपचे 31 नगरसेवक फुटल्याने शिवसेना विरूद्ध भाजप अशी चुरस असून यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.  

गणेश माने देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज ऑनलाईन मतदान होत आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पक्षाकडे 57 नगरसेवक आहेत. तर विरोधी शिवसेनेकडे केवळ 15 सदस्य आहेत परंतु महापौर उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने आव्हान दिले आहे. भाजपचे तब्बल 31 नगरसेवक फुटले आहेत. ते सेनेला मिळाले आहेत. शिवाय एमआयएम च्या तीन सदस्यांनीही सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवड चुरशीची झाली आहे. 

आज मतदान ऑनलाईन.                    
शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी फुटीर गटातील कुलभूषण पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपतर्फे महापौर पदासाठी प्रतिभा कापसे, भारती सोनवणे तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे, मयुर कापसे यांनी आर्ज दाखल केले आहेत. पक्षातर्फे ऐनवेळी उमेदवार ाकारण्याचा निश्चित करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता ऑनलाईन मतदान होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.   

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला....
या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन तसेच शिवसेना नेते राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख