गणेश माने देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

गणेश माने देशमुख यांनी काल रोजी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
ganeshmane18.jpg
ganeshmane18.jpg

अक्कलकोट : जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी काल रोजी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, धवलसिंह मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते. 

गणेश माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उभारणीसाठी प्रचंड मोठा फायदा होणार आहे. सहकार क्षेत्रात जयहिंद परिवाराच्या यशस्वी वाटचालीत गणेश माने देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामूळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल, असा अंदाज राजकीय वर्तृळातुन व्यक्त होत आहे. आचेगाव सारख्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीमेवर कारखाना सुरू करून शेतकरी बांधवाना दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी बांधवांच्या प्रती आस्था ठेऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणारे माने कुटुंबीय यांची गणेश माने देशमुख यांच्या रूपाने काम करीत असलेली युवा पिढी आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा शेतकरी मेळावा घेऊन भाजप कडून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. दुष्काळी भागातील जनतेला आणि शेतकरी यांच्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये तसेच सेंद्रिय शेतीवर काम करणारे एक अभ्यासु उमदे नेतृव अशी त्यांची ख्याती आहे. आता ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द अधिकृतपणे अजमाविण्यासाठी आजपासून प्रारंभ केला आहे. त्यांच्या समर्थकानी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

गणेश माने बापू हे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे (सीओईपी)चे विद्यार्थी आहेत. ते एक दूरदृष्टी असलेले हे युवक नेते आहेत. त्यांची एक वैचारिक बैठक आहे. सर्वांना सतत मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सतत विधायक कामात राहणे हा त्यांचा पिंड आहे. आता येत्या काळात काँग्रेस पक्षाचे काम तळागाळातील जनतेपर्यत पोचवून जनतेच्या उत्कर्षात माझा सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे म्हटले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com