‘अच्छे दिन आले, पेट्रोल शंभर रुपये लिटर झाले’

काँग्रेसच्या वतीने सोमवारी गांधीगिरी पद्धतीने पेट्रोलपंपाला पुष्पहार अर्पण करून प्रतीकात्मक पद्धतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.
congress yeola
congress yeola

येवला : येथे काँग्रेसच्या (Congress agitaion against fuel prices) वतीने सोमवारी गांधीगिरी पद्धतीने पेट्रोलपंपाला पुष्पहार अर्पण करून प्रतीकात्मक पद्धतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी अच्छे दिन आले, पेट्रोल शंभर रुपये झाले, (Pleasent days are back) अशा घोषणा देण्यात आल्या.

पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे पुष्प देऊन ‘अच्छे दिन आले, पेट्रोल शंभर रुपये लिटर झाले, महागाई वाढली’, असे म्हणून ग्राहकांचे स्वागत करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसदरात प्रचंड वाढ केली आहे. पेट्रोलच्या दराने शंभर रुपयांचा टप्पा पार केला आहे. डिझेलचे दरही वाढलेले आहेत, त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी अजून अडचणीत आलेला आहे. गॅसची सबसिडीही मिळत नाही. त्या निषेधार्थ केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे येवला येथे एकनाथ खेमचंद यांच्या पेट्रोलपंपावर आंदोलन झाले.

इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांकडून विविध भागात आंदोलन करण्यात आले. नाशिक शहर, मालेगाव, मनमाड, नांदगावसह विविध शहरात झालेल्या या आंदोलनात नागरिकांशी संपर्क करून केंद्र सरकारने दिलेली आश्वासने व सध्याची इंधनासह विविध वस्तूंच्या दरांत झालेली वाड याबाबत घोषणा, घोषवाक्य व भाषणे करून जनजागृती झाली. त्यामुळे हे आंदोलन पेट्रोल पंपावर नागरिकांच्या उत्सुकतेचा विषय बनले.

या वेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळिराम शिंदे, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, नंदकुमार शिंदे, तालुका सरचिटणीस विलास नागरे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, युवक अध्यक्ष मंगल परदेशी, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मनोहर गुंजाळ, राजेंद्र गणोरे, अशोक नागपुरे, सुभाष शिकलकर, उत्तम कोकाटे, दीपक खोकले, शेरू मोमीन, सिद्दिक अन्सारी, संजय पवार, आदम मोमीन, खंडू शिंदे, प्रतीक राऊत, दिगंबर आव्हाड, प्रल्हाद जगताप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com