पोलिसालाच न्याय मिळेना, तीथे सामान्यांनी कुठे जावे?

जेल रोड परिसरात असलेल्या जय हिंदनगर या ठिकाणी चार जणांच्या टोळक्याने पोलिसाला व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी वारंवार विचारणा करूनही पोलिसांचे तोंडार बोट होते. दबाव वाढल्यावर अखेर दोन दिवसांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Sangamnere
Sangamnere

नाशिक रोड : जेल रोड परिसरात असलेल्या जय हिंदनगर या ठिकाणी चार जणांच्या टोळक्याने पोलिसाला व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी वारंवार विचारणा करूनही पोलिसांचे तोंडार बोट होते. दबाव वाढल्यावर अखेर दोन दिवसांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जर पोलिसच न्यायासाठी एव्हढे दबावात असतील तर सामान्यांनी कुठे जावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.   

जेल रोड भागात शुक्रवारी (ता. ४) रात्री हा प्रकार घडला होता. मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव सागर बाळनाथ शिंदे (रा. जय हिंदनगर, जेल रोड) असे असून, शिंदे नाशिक रोड पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री शिंदे आपला मित्र संजय कुलथे याच्यासोबत गप्पा मारत होते. याचदरम्यान सागर शिंदे यांचा मित्र हृषीकेश चौधरी याचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रशांत पूर्ण नाव माहिती नाही व त्याचे आणखी तीन साथीदार आले. त्यांनी शिंदे व कुलथे यांना दमदाटी करून तात्या चौधरी कुठे आहे, असे विचारले व शिवीगाळ करून पोलिस कर्मचारी सागर शिंदे यांना धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केले. या वेळी संजय कुलथे यांनाही या चार जणांच्या टोळक्याने मारहाण केली. 

या मारहाणीत हे दोघे जखमी झाले. त्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर तब्बल चोवीस तासांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा संबंध थेट भाजपचे नगरसेवक भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयावर एका टोळक्याने हल्ला करून कार्यालयाचे नुकसान केले होते, त्याच्याशी आहे. एकाच दिवशी या दोन्ही घटना घडल्याने जेल रोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेल रोड भागात विविध गटांमध्ये राजकीय तसेच गुन्हेगारी या दोन्ही कारणांनी सातत्याने वाद होत असतात. त्यामुळे एकेकाळी शहरातील कामगारांची वसाहत असलेला हा भाग सध्या हाणामाऱ्या व गुन्हेगारीच्या घटनांनी चर्चेत आहे. या गुन्हेगारांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. पोलिस तर अक्षरशः हतबल असल्याचे दोन दिवसांपूर्वीच्या प्रकरणात दिसून आले.

यापूर्वी या भागात अशाच एका प्रकरणात थेट एका पोलिसावरच हल्ला झाला होता. त्यात त्या पोलिसाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच्या प्रकरणात देखील पोलिसावर हल्ला झाला. मात्र या पोलिसाने त्याबाबत तक्रार दिली नव्हती. त्याबाबत पोलिसांनी सातत्याने मौन बाळगले होते. आता दबाव वाढल्याने दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पोलिसांनाच न्यायासाठी तक्रार दाखल करण्यास एव्हढा विलंब होत असेल तर सामान्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com