भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे जामनेरला दहन

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना धमकी वजा इशारा दिल्याचे पडसाद जामनेरला उमटले. या धमकीच्या विरोधात जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
Jamner
Jamner

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना धमकी वजा इशारा दिल्याचे पडसाद जामनेरला उमटले. या धमकीच्या विरोधात जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर त्यांचे अभिनदन केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावर प्रतिक्रीया म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना तुम्ही जामीनावर सुटलेले आहात. तुमच्यावर न्यायालयात खटले सुरु आहेत. महागात पडेल असा धमकी वजा इशारा दिला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जामनेर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. आज जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी चद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय गरूड तसेच जामनेर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामनेर हा भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचा मतदार संघ आहे.  त्यामुळे या घटनेनंतर तो चर्चेचा विषय ठरला. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com