बारणे म्हणाले, निर्णय दुर्दैवी, तर भेगडेंनी मागीतला सरकारचा राजीनामा

मराठा आरक्षण अवैध ठरविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र होतील, असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (shivsna mp barne warns over maratha reservation verdict) यांनी दिला आहे.
Barne- Bhegde
Barne- Bhegde

पिंपरीः मराठा आरक्षण अवैध ठरविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र होतील, असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (shivsna mp barne warns over maratha reservation verdict) यांनी दिला आहे. 

दरम्यान आजचा दिवस मराठा समाजाच्या दृष्टीने काळा दिवस (black day for maratha community) आहे. त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारने राजीनामा दिला पाहिजे, असे मावळचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले.

राज्य सरकारने नोकरी व शिक्षणात मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनाबाह्य असल्याचे सांगत सर्वोच न्यायालयाने ते आज रद्द ठरवले. त्यावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे न्यायालयाने या निर्णयातून दुर्लक्ष करण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया खासदार  बारणे यांनी `सरकारनामा`ला दिली. केंद्र सरकारने हस्तक्षेप केला, तर यात बदल होऊ शकतो, असे ते म्हणाले.

फडणवीस सरकारने अभ्यास करून दिलेल्या या आऱक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात योग्य बाजू मांडल्याने ते तिथे टिकले. पण, तशीच बाजू महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडणे अपेक्षित होते. मात्र, योग्य पद्धतीने व प्रभावी बाजू न मांडल्याने तेथे ते आरक्षण रद्द झाले, असे माजी आमदार भेगडे म्हणाले. आमची मराठा आरक्षणाच्या बाजूची भूमिका कायमच असून त्यासाठीचे सहकार्य राज्य सरकारला करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, जगाने नोंद घेतलेल्या मराठा समाजाच्या शांतीपूर्ण महामोर्चात कर्तव्य म्हणून मी सुद्धा सहभागी झालो होतो. त्यावर समाजाला अपेक्षित निर्णय न होण्यामागे राज्य सरकार दोषी आहे. हे या सरकारचे अपयश आहे. म्हणून त्यांनी याबद्दल जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. प्रत्येक बाबतीत हे सरकार अपयशी ठरते आहे. मराठी समाजच नाही, तर हे सरकार जनतेच्या देखील हिताचे नाही.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com