हे सरकार गोंधळलेले! राष्ट्रवादीच्या नेत्याचा घरचा आहेर... 

मुख्यमंत्री वेगळेच सांगतात तर, शिक्षणमंत्री शाळा सुरू करण्याबाबत वेगळीच तारीख जाहीर करतात हा सर्व गोंधळ सुरू आहे.
Dr. Satish Patil & Uddhav Thackeray (23).jpg
Dr. Satish Patil & Uddhav Thackeray (23).jpg

जळगाव : कोरोना (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसापांसून शाळा बंद आहेत. यास पर्याय म्हणून ऑनलाईन पध्दतीने (Online Education) विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र, यास आता विद्यार्थी आणि पालक कंटाळले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा सरू करण्याची मागणी होत आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  व माजी मंत्री डॅा सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. पाटील म्हणाले, "पाच राज्यात सर्वच गोष्टी सुरू झाल्या आहे, त्यामुळे शाळा बंद करून काही होणार नाही. त्या आता सुरू झाल्या पाहिजेत. मात्र, त्या सुरू करण्याबाबत राज्याचे मंत्रीमंडळ गोंधळलेले आहे. शिक्षण मंत्री एक घोषणा करतात, मुख्यमंत्री दुसरीच तारीख देतात." असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. 

ते पुढे म्हणाले,  "राज्यात शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निश्चित भूमिका शासनाने घेतलेली नाही. त्या सुरू कराव्यात की नाही याबाबत सरकारमध्ये सुध्दा एकमत नाही. त्यामुळे सर्वच संभ्रम निर्माण झाला आहे." याबाबत आता स्थानिक पातळीवर राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत मित्र पक्षातील नेतेही उघडपणे बोलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्ह्या तर्फे आज (ता.५) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातर्फे आदर्श शिक्षकांचा सन्मान कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष अॅड.  रविंद्र पाटील, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, कल्पना पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सतीष पाटील यांनी आपले मत मांडले, "शाळा कधी उघडणार या बाबत आता पालकांकडून विचारणा होत आहे. आज सर्वच सुरू झाले आहे. मग शाळा बंद करून काय साध्य होणार आहे, असे पालक म्हणत आहेत." ऑनलाईन शिक्षण मुलांच्या फायदायचे असल्याचे दिसत नाही, उलट मुलांचे नुकसान होत असल्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. आज शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात एकमत नाही, मुख्यमंत्री वेगळेच सांगतात तर, शिक्षणमंत्री शाळा सुरू करण्याबाबत वेगळीच तारीख जाहीर करतात हा सर्व गोंधळ सुरू आहे. मात्र, आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे त्याचा विचार होणे गरजेचे आहे." असे पाटील म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com