अनिल देशमुखांना मोठा धक्का : लूकआऊट नोटीस जारी? 

ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहे.
 Anil Deshmukh .jpg
Anil Deshmukh .jpg

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणांनी त्यांच्या भोवतीचा फास आणखी आवळत चालवला आहे. त्यांच्या विरोधात आता ईडीने (ED) लुकआउट नोटीस जारी केली आहे. या बाबतचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही त्या  संदर्भात ट्वीट केले आहे. (Lookout notice issued against Anil Deshmukh) 

देशमुख यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस बजावली असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता त्यांना देश सोडून जाता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. 

ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहे. मात्र, देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी ईडीने केली आहे. पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या आधी परमबीरसिंह यांच्या विरोधातही ठाणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली आहे. देशमुख यांच्या नोटीशी संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नोटीस बजावली नसल्याचे म्हटले आहे.   

दरम्यान, देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने cbi सीबीआयचे उपनिरिक्षकाला अटक केली आहे. हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टीमने तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले होते. त्यामुळे तिवारी आणि डागा यांना दिल्लीला नेण्यात आले होते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com