स्थानिक नेत्यांच्या तक्रारीमुळे राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा राजीनामा

स्थानिक नेत्यांच्या वारंवार तक्रारीमुळे मी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो.
Sarkarnama.png
Sarkarnama.png

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील Abhishek Patil यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांना अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पाठविला आहे. आपल्याला जळगाव महानगर अध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करावे अशी त्यांनी पत्रात विनंती केली

या पत्रात त्यांनी म्हटले आहे,की, मी या पदावर जळगाव शहर विधानसभा लढविल्यापासून आजतागायत १७ महिन्यापासून कार्यरत आहे. या काळात मला स्थानिक नेत्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. मी निरपेक्ष निर्भिड पणे पक्ष बांधणीचे काम प्रामाणिकपणे केले.  

''मला आता स्वतः; पक्षाचे  तळागाळात काम करावयाचे आहे. स्थानिक नेत्यांच्या वारंवार तक्रारीमुळे मी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो. तरी मला वरील संघटनेच्या पदावरून मुक्त करावे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात इमाने इतबारे काम करेन,'' असे पत्र त्यांनी बुधवार (ता.८) पाठविले आहे. काल त्यांनी सोशल मीडियावर ते पत्र व्हायरल केले आहे.

जळगाव : आधीच कोरोनामुळे  (Covid-19),नागरिक हैराण आहेत. त्यात, जळगाव शहरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरलेली असताना महापालिकेत सत्ताधारी असलेली  शिवसेना (Shivsena), सुस्त झाली आहे. याचा निषेध म्हणून जळगाव भाजपच्या (Jalgaon Bjp),वतीने महापालिकेत फवारणी करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने शहरातील अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाली आहे. यामुळे मोठ्या संख्येने शहरातील नागरिक खासगी रूग्णालयात  पैसे खर्च करून उपचार घेत आहेत. मात्र, जळगाव महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र, सुस्त पडला असून याबाबत कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना विभागाकडून  केल्या जात नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com