शिवसेनेच्या निषेधासाठी भाजपने केली फवारणी...  

कोणत्याही प्रतिबंधात्मकउपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूनकेल्या जात नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
Jalgaon Bjp Andolan (9).jpg
Jalgaon Bjp Andolan (9).jpg

जळगाव : आधीच कोरोनामुळे  (Covid-19),नागरिक हैराण आहेत. त्यात, जळगाव शहरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरलेली असताना महापालिकेत सत्ताधारी असलेली  शिवसेना (Shivsena), सुस्त झाली आहे. याचा निषेध म्हणून जळगाव भाजपच्या (Jalgaon Bjp),वतीने महापालिकेत फवारणी करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.(Jalgaon BJP protests Against Shiv Sena)


जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने शहरातील अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाली आहे. यामुळे मोठ्या संख्येने शहरातील नागरिक खासगी रूग्णालयात  पैसे खर्च करून उपचार घेत आहेत. मात्र, जळगाव महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र, सुस्त पडला असून याबाबत कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना विभागाकडून  केल्या जात नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. 

महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधारी महापौर, उपमहापौर याकडे दुर्लक्ष  करीत असल्याने जनतेचे आरोग्य धोकयात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी  शहर भाजपच्या वतीने आज हे फवारणी करून अनोखे आंदोलन करण्यात आले. महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. महापालिकेत फवारणी यंत्राचे पूजन करून, संपूर्ण महापालिकेत फवारणी करण्यात आली.

शहरात तातडीने फवारणी सुरू करावी व साथ आटोक्यात आणवी अशी मागणी करण्यात आली.यावेळी सत्ताधारी शिवसेनेचे महापौर, उपमहापौर यांचाही निषेध करण्यात आला.  यावेळी भाजप नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com