नाशिकसाठी मुंबई, ठाणे महापालिकांकडे लसची मागणी करणार

शहरासाठी तत्काळ लस उपलब्ध होण्यासाठी मुंबई व ठाणे महापालिकेच्या जागतिक पातळीवरच्या निविदाप्रक्रियेत सहभागी होऊन लशींची मागणी केली जाणार आहे. साधारण पाच लाख लशींची मागणी नोंदविली जाईल. त्यासदर्भात दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांशी संवाद साधला जाईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
Kailas Jadhav
Kailas Jadhav

नाशिक : शहरासाठी  तत्काळ लस उपलब्ध होण्यासाठी मुंबई व ठाणे महापालिकेच्या जागतिक पातळीवरच्या निविदाप्रक्रियेत सहभागी (Nashik will involve in Mumbai, Thane`s Globol Tender for vaccine) होऊन लशींची मागणी केली जाणार आहे. साधारण पाच लाख लशींची मागणी नोंदविली जाईल. (Nashik will Require 5 lacs Vaccine) त्यासदर्भात दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांशी संवाद साधला जाईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव (com. Kailas Jadhav) यांनी दिली.

महापालिकेने जागतिक पातळीवर स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्यास पुरवठा होईपर्यंत दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल तोपर्यंत केंद्र व राज्य शासनाची लस उपलब्ध होईल. त्यामुळे लशींचा साठा पडून राहील. लस सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेजची आवश्यकता भासेल.

शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या मोठी असताना दुसरा डोससाठीदेखील प्रतीक्षायादी वाढली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मागणीच्या तुलनेत अपुरा साठा उपलब्ध होत असल्याने व उपलब्ध झालेला साठा फक्त दोन दिवस पुरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने स्वखर्चाने लसीकरण करण्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मंगळवारी (ता. १८) आयुक्त कैलास जाधव यांच्या दालनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेतल्यानंतर आयुक्त जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.
लस वेळेत मिळेल का?

लस प्राप्त करण्यासाठी राज्य शासनदेखील वेटिंगवर आहे. नाशिक महापालिकेला लस खरेदी करण्यात निधीची अडचण नाही. मात्र जागतिक पातळीवर निविदा काढल्यानंतरही लस वेळेत मिळेल का, हा प्रश्‍न आहे. जुन, जुलैमध्ये कोरोना संसर्ग उतरणीला लागेल. महापालिकेने जागतिक पातळीवर निविदा काढून लस खरेदी केल्यास त्याचवेळी केंद्र व राज्य शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास अतिरिक्त साठा होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिकेने जागतिक पातळीवर प्रसिद्ध केलेल्या निविदेत सहभागी होऊन या महापालिकांकडूनचं लस मागविली जाईल, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

पाच लाख लशींची गरज
२०११ च्या लोकसंख्येनुसार १४ लाख लोकसंख्येचे लसीकरण आवश्‍यक आहे. सध्या तीन लाखांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून देखील लस उपलब्ध होणार असल्याने मुंबई व ठाणे महापालिकेकडे पहिल्या टप्प्यात पाच लाख लशींची मागणी नोंदविणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटाला प्राधान्य दिले जाईल.

या बैठकीत महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, रिपाइं गटनेत्या दिक्षा लोंढे आदी उपस्थित होते.
...
कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा विचार करता नाशिक महापालिकेला लसीकरणासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. तुटवडा लक्षात घेता व वेळेचे बंधन लक्षात घेऊन स्वखर्चाने लस घेतली जाणार आहे.
- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com